मुंबई

आता मुंबईतील कंटेनमेंट क्षेत्र गुगल मॅपवर, चेक करा बातमीतील लिंक

समीर सुर्वे

मुंबई : मुंबईतील कोविड प्रतिबंधीत क्षेत्र आता गुगल मॅपवरही पाहता येणार आहे. गुगल कंपनीने मुंबईसाठी ही सुविधा मोफत उपलब्ध करुन दिली असून जगभरात या तंत्राचे अनुकरण होणार आहे. 

मुंबईसह राज्यात लॉकडाऊनचा 5 वा टप्पा सुुरु आहे.मात्र,तेवढ्याचा प्रमाणात कोविडचा धोका आहे.मुंबईत सध्या 643 प्रतिबंधीत क्षेत्र असून 10 हजार 99 सिल इमारती आहेत.गुगल मॅपवर मुंबईतील प्रतिबंधीत क्षेत्र दिसावी यासाठी महापालिकेने गुगल कंपनीशी चर्चा केली.या कंपनीनेही पालिकेच्या मागणील प्रतिसाद देत मोफत ही सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला असून ती प्रक्रियाही सुरु केली आहे.मोबाईल गुगल मॅप ऍप्लिकेशनवर कोविड 19 इन्फो हा पर्याय निवडून मुंबईचा नकाश उघडल्यास प्रतिबंधीत क्षेत्रांची माहिती मिळू शकले. त्याचबरोबर  http://stopcoronavirus.mcgm.gov.in या संकेतस्थळावरही ही माहिती उपलब्ध आहे.

या संकेतस्थळावर मेन्यूमध्ये इनसाईट मॅप हा पर्याय स्विकारल्यास ही माहिती मिळू शकेल असं महानगर पालिकेकडून सांगण्यात आले. मुंबईने जगाला हा नवा मार्ग दाखवला असून आता जगभरातील या पध्दतीचा वापर होणार आहे. तर, पालिकेची ही माहिती नियमीत पणे अपडेट करण्यात येणार आहे. 

यापुर्वीही मुंबई महानगरपालिकेने तंत्रज्ञांनाचा वापर करुन नागरीकांना कोविड बाबत विविध माहिती पुरविण्याचा प्रयत्न केला.विशेषत: गुगलच्या मदतीनेही हे उपाय केले जात आहे.गुगल सर्च इंजिन मध्ये मुंबई कोरोना व्हायरस अपडेट असे टाईप केल्यास पालिका संकेतस्थळा, समाजमाध्यम विशेषत: ट्विटररही होणारे अपडेट उपलब्ध होतात. 

जागतिक बॅंकेने केले कौतुक 

मुंबई पालिकेने धारावीत कोविड प्रतिबंधासाठी केलेल्या कामाचे जागतिक बॅंकेने कौतुक केले आहे.शोध,चाचणी उपचार ही त्रिसुत्री वापरुन पालिकेने धारावी सारख्या दाटीवाटीच्या वस्तीतील कोविड संसर्गावर नियंत्रण मिळवले.त्यासाठी पालिका कर्मचारी आणि सामाजिक संस्थांनी एक दिलाने काम केले अशा शब्दात जागतिक बॅंकेने पालिकेने कौतुक केले आहे.यापुर्वी जागतिक आरोग्य संघटनेही धारावी मॉडलचे कौतुक केले होते.तर,फिलीपाईन्स मध्येही धारावी पॅटर्न राबवला जात आहे. 

कोविड रुग्णांना जलद आणि सुलभ पध्दतीने उपचार मिळावे यासाठी पालिकेच्या वॉर रुम मार्फत रुग्णालयातील खाटांचे वितरण केले जात आहे.जुन महिन्या पासून सप्टेंबर पर्यंत तब्बल 82 हजार 973 रुग्णांना खाटांचे वितरण पालिकेच्या वॉर रुम मार्फत करण्यात आले आहे.यासाठी 24 प्रभाग कार्यालयात प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र वॉर रुम तयार करण्यात आली आहे.आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांनी ही संकल्पंना रुजवली आहे.या वॉर रुममार्फत फक्त खाटांचे वितरण केले जात नसून रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांचे समुपदेशनही केले जात आहे. 24 तास ही वॉर रुम सुरु असते अशी माहिती पालिकेकडून देण्यात आले.

( संपादन - सुमित बागुल )

contentment zones of mumbai are now on google map check link in the news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

आजचे राशिभविष्य - 19 सप्टेंबर 2025

अग्रलेख : डिजिटल अरेस्ट

AFG vs SL Live : श्रीलंकेचा 'कुशल' विजय! अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात; बांगलादेशला लागली लॉटरी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT