मुंबई

उल्हासनगरातील हॉटेल्सचे विलगीकरण कक्षांत रूपांतर; सर्व खर्च रुग्णांच्या खिशातून करणार

सकाळ वृत्तसेवा


उल्हासनगर : पालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षांमध्ये ज्या रुग्णांना राहण्याची इच्छा नाही. अशा रुग्णांसाठी पालिकेच्यावतीने तीन हॉटेल्सचे विलगीकरण कक्षात रूपांतर केले आहे. याठिकाणी राहू इच्छिनऱ्यांना रिपोर्ट येईपर्यंत राहण्याचा-जेवणाचा खर्च स्वतः करावा लागणार, असा आदेश देखील उल्हासनगर पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी बुधवारी (ता.13) जारी केला आहे.

कॅम्प नंबर 3 मधील सम्राट अशोक नगर, शांतीनगर ब्राह्मणपाडा, गोलमैदान येथे सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. हे तिन्ही परिसर हॉट-स्पॉट जाहिर करण्यात आले असून ते सील करण्यात आलेले आहेत. यासोबत काही पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने श्रीराम नगर, अंबिका मित्र मंडळ,  संभाजी चौक, आदर्श नगर,  मराठा सेक्शन हे भाग देखील सील आहेत. संबंधित पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

कॅम्प नंबर 3 मध्ये सेंट्रल पार्क, साई प्लाझा, डॉल्फिन ही लॉजिंग-बोर्डिंग असणारी मोठी हॉटेल्स आहेत. यांचे रुपांतर विलगीकरण कक्षात करण्यात आले आहे. सध्या उल्हासनगरात कॅम्प नंबर 5 मध्ये टेऊराम धर्मशाळा,  कॅम्प नंबर 3 मध्ये रेड क्रॉस व शासकीय मध्यवर्ती रुग्णालय तसेच कामगार हॉस्पिटल यासोबत भिवंडी बायपास वर आमंत्रा या इमारतीत विलगीकरण कक्ष आहेत. दरम्यान जे रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यांचे नातलग, निकटवर्तीय, संपर्कात आलेल्यांना वरील कक्षांमध्ये ठेवण्यात आलेले आहे. मात्र या कक्षांमध्ये व्यवस्थित देखभाल होत नसल्याच्या तक्रारी सुधाकर देशमुख यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार या कक्षांमध्ये थांबू इच्छित नसणाऱ्यांनी स्वखर्चाने विलगीकरण कक्षांमध्ये रूपांतर करण्यात आलेल्या हॉटेल्स मध्ये थांबण्याचा आदेश सुधाकर देशमुख यांनी काढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यास तयार, पण...''; ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा निर्णय

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Army Success Story: कष्टाच्या जाेरावर भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी अभिषेक बिडकर; १३ लाख विद्यार्थ्यांमधून यशाला गवसणी, आई-वडिलांच्या डाेळ्यात पाणी!

Maharashtra Kesari: मानाच्या गदेसाठी हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड लढणार; जय पाटील, सिकंदर शेख पराभूत

Baramati News: कृषी फीडरवरील वीजपुरवठा सलग पाच दिवस खंडित; ग्रामीण भागात संताप

SCROLL FOR NEXT