Abortion decreases
Abortion decreases sakal media
मुंबई

मुंबईत गर्भपाताच्या प्रमाणात घसरण; तीन वर्षात ३४ टक्के घट

भाग्यश्री भुवड

मुंबई :  कोरोनाचा घसरता आलेख (corona) पाहता पालिकेच्या आरोग्य विभागासाठी (bmc health authorities) एक आनंदाची बातमी आहे. पालिकेकडून सुरु असलेल्या जनजागृतीचा (people awareness) सकारात्मक परिणाम होत आहे. दरवर्षी गर्भपात होण्याचे प्रमाण कमी होत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, सध्या दररोज सरासरी 70 गर्भपात (Abortion ratio decreases) होत आहेत. तर तीन वर्षांपूर्वी ही संख्या 106 होती. या आकडेवारीनुसार, गेल्या तीन वर्षांत गर्भपाताच्या घटनांमध्ये 34 टक्क्यांनी घट झाली आहे.

पालिका गर्भपाताबाबत वेळोवेळी जनजागृती करत असते. गर्भपात आणि गर्भधारणा टाळण्यासाठी पालिका आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने महिलांना जागरूक करत आहे. यामुळेच महिला नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना करत असताना, गर्भपाताच्या घटनाही कमी होत आहेत. शहरातील सर्व परवानाधारक मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (एमटीपी) केंद्रांकडून पालिकेने गोळा केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, गेल्या तीन वर्षांत गर्भपाताच्या संख्येत घट झाली आहे. 2018 मध्ये, एमटीपी केंद्रांमध्ये 38,579 गर्भपाताच्या प्रकरणांची नोंद झाली.

हीच संख्या 2019 मध्ये 37,161 वर आली. 2020 हे वर्ष पूर्णपणे कोरोनामध्ये सरले. या कोरोना वर्षात गर्भपाताच्या प्रकरणांमध्ये सर्वात मोठी घट झाली आहे. सन 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये गर्भपाताच्या प्रकरणात 14 हजारांनी घट झाली आहे. 2020 मध्ये गर्भपाताच्या 23,415 प्रकरणांची नोंद झाली. 2021 मध्ये गर्भपातात आणखी घट झाली आहे. ऑक्टोबर 2021 पर्यंत, एमटीपी केंद्रांमध्ये 21,042 महिलांनी गर्भपात केला.

गर्भपाताचा आलेख दरवर्षी घसरत आहे, हा पालिकेच्या जनजागृतीचा परिणाम असल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. याचे मुख्य कारण म्हणजे स्त्रिया सुरक्षिततेच्या उपायांचे पालन करत आहेत जेणेकरून त्यांना गर्भधारणा टाळता येईल. नको असलेल्या गर्भधारणेमुळेच महिला गर्भपातासाठी केंद्रापर्यंत पोहोचतात. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.सोनल कुमटा यांनी सांगितले की, आजच्या काळात गर्भधारणेबाबत अधिकाधिक जनजागृती होण्याची गरज आहे. आजही अनेक महिला आहेत ज्यांना गर्भधारणा पुढे ढकलायची आहे.

त्यामुळे या महिलांना गर्भधारणा टाळण्यासाठी उपलब्ध साधनांची माहिती करून देणे आवश्यक आहे. त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे अनेक स्त्रिया आहेत ज्यांनी नको असलेली गर्भधारणा टाळण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि एक डॉक्टर म्हणून आम्ही त्यांना गर्भधारणा टाळण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व माध्यमांची जाणीव करून देतो आणि ते देखील त्याचे पालन करतात.

गर्भनिरोधक काम करत नाही

पालिका आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, गर्भपाताच्या विश्लेषणातून एक गोष्ट समोर आली की, मुलींनी गर्भनिरोधक घेतल्यानंतरही त्या गर्भवती राहिल्या आहेत. 2021 मध्ये, एकूण गर्भपातांपैकी 50 टक्क्यांहून अधिक गर्भनिरोधकांच्या अपयशामुळे झाले. हा आकडा नको असलेल्या गर्भधारणेच्या इतर कारणांमध्ये मोठा होता. इतर प्रकरणांमध्ये, आईच्या जीवाला धोका होता आणि मूल असामान्य असण्याची शक्यता होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : Lok Sabha Election 2024 : जाणून घ्या 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT