मुंबई

पनवेलच्या ग्रामीण भागात कोरोना आटोक्‍यात; रॅपिड अँटिजेन चाचणीवर भर

वसंत जाधव

नवीन पनवेल : कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत असताना तत्काळ उपाययोजना करता याव्यात, यासाठी शहरीसह आता पनवेल ग्रामीण भागातही रॅपिड अँन्टीजेन चाचणी करण्यात येत आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनिल नखाते यांनी दिली. पनवेलच्या ग्रामीण भागात ता.3 सप्टेंबर पासून अँटिजन टेस्टला सुरुवात करण्यात आली आहे. 

ता. 21 अक्‍टोबर पर्यंत पनवेल ग्रामीण भागातील अजिवली, गव्हाण, आपटा, वावंजा, नेरे इत्यादी प्राथमिक आरोग्य केंद्रात 3633 रॅपिड अँन्टीजन टेस्ट झाल्या आहेत. त्या मध्ये 462 रूग्णांचा टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या आहेत, तर 3171 टेस्ट या निगेटीव्ह आलेल्या आहेत, या पैकी 89 पॉझिटिव्ह रूग्ण हे 50 वयाच्या वरचे आहेत हे प्रमाण एकूण पॉझिटिव्हच्या 19.26 % एवढे आहे. 

सुरवातीला ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिवसाला 200 ते 300 टेस्ट केल्या जात होत्या तर सध्या या भागात दिवसाला 30 ते 50 टेस्ट केल्या जात आहेत व 25 ते 30 पॉझिटिव्ह रूग्ण सापडत आहेत. या महिन्यात पावसामुळेही चाचण्याचे प्रमाण कमी झालं आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाद्वारे स्क्रीनिंग करताना लोकांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहेत, पनवेल ग्रामीण मध्ये 6787 रूग्णांचा आकडा झाला असून 6313 रूग्ण बरे झाले आहेत तर आत्तापर्यंत 130 मृत्यूची नोंद झाली असून सध्य स्थितीत 344 येवढे पॉझिटिव्ह रूग्ण ग्रामीण भागात आहेत. 

ग्रामीण व महापालिका क्षेत्रासाठी एकच रूग्णालय 
पनवेल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहेत, पनवेल ग्रामीण आणि शहरातील रुग्ण पनवेल येथील एकाच उपजिल्हा रुग्णालयांवर अवलंबून आहेत त्यामुळे संपूर्ण महापालिका क्षेत्र व तालुक्‍याचा ताण एकाच रूग्णालयावर येत आहे. 

माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानात ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंब सहभागी होत आहे,आरोग्य विभाग ग्रामीण भागातील घराघरात पोचत आहे त्या मार्फत मास्क सॅनिटायझरचा पावर व सोशल डिस्टंन्स चे नियम पाळण्या विषयी आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्यावर जास्त भर दिला जात आहे.रूग्ण संख्या कमी करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. 
डॉ सुनिल नखाते 
तालुका आरोग्य अधिकारी पनवेल 

कोविड 19 रॅपिड एँन्टीजन टेस्ट प्राथमिक आरोग्य केंद्र विभागा नुसार 
गव्हाण- 460 
वावंजे - 539 
नेरे- 777 
अजिवली- 758 
आपटा- 444 
उलवे- 655 
टोटल झालेल्या 3633 टेस्ट 

कोविड 19 रॅपिड ×न्टीजन पॉझिटिव्ह टेस्ट प्राथमिक आरोग्य केंद्र विभागा नुसार 
गव्हाण- 16 
वावंजे -43 
नेरे- 93 
अजिवली- 136 
आपटा-20 
उलवे- 153 
टोटल- 462 पॉझिटिव्ह टेस्ट 

या मध्ये 50 वया पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रूग्ण 
गव्हाण- 8 
वावंजे -6 
नेरे- 11 
अजिवली- 27 
आपटा-2 
उलवे- 35 
टोटल- 89 पॉझिटिव्ह 

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

Weekly Horoscope: १४ ते २० सप्टेंबरचा आठवडा ठरणार खास! या राशींना मिळणार पैसा, करिअरमध्ये संधी आणि प्रेमात सुख

Koyna Dam : सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग

Marathi News Live Updates : वरंधा घाटात मध्यरात्री दोन कारची समोरासमोर धडक, तिघे गंभीर जखमी

Ratnagiri CNG: ऐन गणेशोत्सवात सीएनजीचा ठणठणाट; रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वरात रांगा; चाकरमानीसह रिक्षाचालक त्रस्त

SCROLL FOR NEXT