uran 
मुंबई

उरणमध्ये कोरोनाचा भडका, एकाच दिवशी 21 कोरोनाग्रस्त

सकाळवृत्तसेवा

उरण : उरणमध्ये कोरोनाचा भडका उडाला असून, एकाच दिवशी 21 रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत. करंजा सुरकीचा पाडा येथील कोरोना रुग्णाच्या अत्यंत जवळच्या नातेवाइकांपैकी 21 जणांची चाचणी केली होती, त्यांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे उरणमध्ये कोरोनाच्या संख्येत भर पडली असून ती 29 वर पोहचली आहे. त्यामुळे उरणकरांची चिंता वाढली आहे.

दोन महिन्यांपासून उरणमध्ये कोरोना आटोक्यात होता. आत्तापर्यंत आठ कोरोना रुग्णांपैकी चार रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. तर चार जणांवर पनवेल येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, करंजा येथील सुरकीचा पाडा येथे सापडलेल्या आठव्या कोरोनाच्या रुग्णामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या 72 व्यक्तींना क्वारंटाईन केले होते. त्याच्या जवळच्या नातेवाईकांपैकी 21 जणांची चाचणी प्रशासनाने केली होती. त्या सर्वांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून त्यांना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. राजेंद्र इटकरे यांनी दिली.

उरणमध्ये कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 29 वर पोहचली आहे. त्यातील 25 जण उपचार घेत आहेत, तर चार जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तसेच, शनिवारी गावातील आणखी 43 जणांची खासगी लॅबमध्ये चाचणी केली आहे, त्यांचा अहवाल येणे बाकी आहे.

Corona eruption in Uran, 21 corona positive in a single day

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT