मुंबई

कोरोनाबाधित गर्भवतींना मलेरिया, डेंग्यूचाही धोका, नायरच्या तीन गर्भवतींवर अभ्यास

भाग्यश्री भुवड

मुंबई: कोरोनाग्रस्त गर्भवतींवर मुंबईत योग्य उपचार होत असून त्या बऱ्या होऊन घरी जात आहेत. हे खरे असले तरी गर्भवतींना कोरोनाची लागण होऊच, नये यासाठी त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी कुटुंबासह डॉक्टरांनीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण गर्भवतींना कोरोनासह डेंग्यू आणि मलेरियाचीही लागण होत असून त्यात त्यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिपरोडेक्टिव्ह हेल्थ-) च्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे.

याच पार्श्वभूमीवर, NIRRH ने कोरोनाग्रस्त गर्भवती महिला उपचारांसाठी दाखल झाल्यास त्यांची मलेरिया आणि डेंग्यू चाचणी करावी, अशा सूचना डॉक्टर आणि रुग्णालयांना केल्या आहेत. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात, अशा तीन कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्ण आढळल्याचेही एनआयआरआरएचने आपल्या अभ्यासात नमूद केले आहे. या पैकी दोघींना मलेरिया आणि एकीला डेंग्यू झाला होता. कोरोना आणि मलेरिया, डेंग्यूची लक्षणे सारखीच असल्याने उपचार करताना गफलत होऊ शकते. या तीन ही महिलांना कोरोनावरील उपचार मिळाले. मात्र, डेंग्यू आणि मलेरियावरील उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे, त्यातील एका महिलेचा गर्भपातही झाला. त्यामुळे, जर कोरोनासह डेंग्यू आणि मलेरियाचे जर या महिलेला मिळाले असते तर गर्भपात रोखता आला असता असे राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थेच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

शेकडो कोरोनाग्रस्त गर्भवती महिला कोरोनावर मात करून प्रसूती होऊन सुरक्षित घरी गेल्या आहेत. ही सकारात्मक बाब असली तरी गर्भवतींची विशेष काळजी सध्याच्या घडीला अत्यंत आवश्यक आहे, असे डॉक्टर सांगतात. त्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती अधिक असून त्यामुळे बाळंतपणात अडचणी येण्याची शक्यता असते. कोरोनाग्रस्त मातेच्या नाळेतून पोटातील बाळाला कोरोनाचा संसर्ग होत असल्याची, गर्भपात होत असल्याचीही उदाहरणे समोर आली आहेत. नायरमधील अशाच तीन रुग्णांमधील लक्षणे उपचारांनंतर ही कायम असल्याने त्यांची मलेरिया आणि डेंग्यूची चाचणी करण्यात आली. तेव्हा काहींना कोरोनाबरोबर मलेरिया तर काहींना डेंग्यूही झाल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांच्यावर मलेरिया-डेंग्यूचे उपचार करण्यात आले. 

वेळेत निदान झाल्याने आणि उपचार मिळाल्याने या रुग्णांचा आजार बळावला नसल्याची माहिती एनआयआरआरएचचे शास्त्रज्ञ डॉ. दीपक मोदी यांनी दिली. गर्भवती रुग्णांची कोरोना चाचणी तसेच मलेरिया-डेंग्यू चाचणीही करावी, अशा सूचना एनआयआरआरएचने दिल्या आहेत. कोरोना आणि मलेरिया-डेंग्यूची लक्षणे सारखीच असल्याने कोरोनाचीच चाचणी आणि उपचार होतात. पण, कोरोनात रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने मलेरिया-डेंग्यूही होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता मलेरिया-डेंग्यूची चाचणी आवश्यक आहे, असे डॉ. मोदी यांनी स्पष्ट केले आहे. 

कोविड -19 चा प्रादुर्भाव भारतातील आदिवासी आणि ग्रामीण भागांपर्यंत पोहोचला असून सार्वजनिक आणि खाजगी या दोन्ही यंत्रणांनी आरोग्य यंत्रणेस बळकटी आणावी जेणेकरुन संसर्गांचे निदान आणि योग्य व्यवस्थापन केले जाईल. कोविड -19 सह मलेरिया आणि डेंग्यूसारख्या को-इन्फेक्शनची लवकर ओळख पटण्यासाठी डॉक्टर आणि प्रसूति चिकित्सकांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे ही अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. 

बीवायएल नायर रुग्णालय आणि आयसीएमआर-एनआयआरआरएचच्या संशोधकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्त्रीरोगशास्त्र जर्नलमध्ये “सार्स-कोव्हिड -2” असलेल्या गर्भवती महिलांमध्ये मलेरिया आणि डेंग्यूचा संसर्ग होण्याचा संयुक्तपणे हा लेख प्रकाशित केला असून  संशोधकांनी सार्स कोव्हिड 2 संसर्ग झालेल्या गर्भवती महिलांना मलेरियाचा आणि डेंग्यूचा संसर्ग देखील झाला आहे.

-----------------

(संपादनः पूजा विचारे)

Corona infected pregnant women at risk of malaria dengue Nair hospital study three women

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT