मुंबई

काँग्रेसच्या बड्या नेत्याला कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्यात कोरोनाचे थैमान वाढत दिवसेंदिवस वाढतच आहे. लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे..

एच के पाटील हे गेल्या आठवड्यात एक दिवस मुंबईला आले होते. त्यावेळी पाटील यांनी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेटही घेतली होती, या बैठकीला बाळासाहेब थोरात, विजय वड्डेटीवार, अमित देशमुख,  अशोक चव्हाण इत्यादी बडे नेते उपस्थित होते. त्यानंतर पाटील यांना काहीसे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी कोरोनाची चाचण केली होती. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आपल्या संपर्कात आल्याल्यांनीही चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. याआधीही राज्यातील बड्या लोकप्रतिनिधींना कोरोनाने बाधित केल्याचे समोर आले होते.

मुंबई महापालिकेची मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई

सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यावर महापालिकेने कारवाईचा वेग वाढवला आहे. एप्रिलपासून 4 महिन्यात 4 हजार 989 जणांवर कारवाई करण्यात आली होती.  गेल्या 13 दिवसात 9 हजार 218 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेने आतापर्यंत 52 लाख 76 हजाराचा दंड वसूल केला आहे. पहाटेपासूनच महापालिकेची पथक मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ChatGPT India Ban : भारतात चॅटजीपीटी बंद होणार, अमेरिकेच्या टॅरिफ झटक्यानंतर आता AI वापरलाही फटका? ट्रम्प यांच्या चाणक्याची खेळी

Whatsapp मध्ये होतोय मोठा बदल! येत आहे Youtube सारखं फीचर; काय आहे अन् कसं वापरायचं? पाहा

Mumbai Mahapalika: मुंबईतील भाजपच्या विजयामुळे 'आसाम'ची सभा गाजली, नरेंद्र मोदींचे मोठे विधान!

Panchgrahi Yog 2026: मकर राशीत पंचग्रही राजयोग; 'या' 3 राशींचे जीवन बदलणार, एकदा वाचा नाहीतर संधी हातातून निसटेल!

BMC Election: मुंबईत सर्व दलित पक्षांना ‘भोपळा’! मतपेढी असूनही सुमार कामगिरी; राखीव प्रभागातही पाटी कोरी

SCROLL FOR NEXT