ठाण्यात तरुणाई कोरोनाच्या विळख्यात 
मुंबई

ठाण्यात तरुणाई कोरोनाच्या विळख्यात; सर्वाधिक रुग्ण या वयोगटातील 

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. विशेष म्हणजे आजाराने बाधित होणाऱ्या रुग्णांमध्ये 1 ते 40 वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक तीन हजार 357 असल्याचे सरकारी आकडेवारी वरून स्षष्ट झाले आहे. 

ठाणे जिल्ह्यात मे च्या अखेरपर्यंत सात हजार 387 रुग्ण आढळले आहेत, तर दुसरीकडे 3 हजार 505 इतके रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच 3 हजार 655 रुग्णांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. 223 जणांचा मृत्यू झाला आहे. 28 मे पर्यंत जिल्ह्यात नोंद झालेल्या सात हजार 45 रुग्णांमध्ये चार हजार 659 पुरुष रुग्ण आहेत. तसेच दोन हजार 386 स्त्री रुग्ण आहेत. या रुग्णांचे पाच वयोगटात वर्गीकरण केले आहे. त्यामध्ये 1 ते 25 या वयोगटात 1 हजार 571 इतके रुग्ण आहेत. 26 ते 40 या वयोगटात सर्वाधिक 1 हजार 786 रुग्ण असून 41 ते 50 मध्ये 1 हजार 497 रुग्ण सापडले आहेत. 51 ते 60 वयोगटामध्ये 1 हजार 363 रुग्ण आढळले असून 60 च्या पुढील वयोगटात 828 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

पालिका परिसरात रुग्णसंख्या जास्त
ठाणे महापालिका परिसरात पाच ही वयोगटात रुग्णांची संख्या अधिक आहे. यामध्ये 26-40 या वयोगटात 746 रुग्ण आहेत. त्या खालोखल 1 ते 25 या वयोगटात 630 रुग्ण असून 60 वरील गटात सर्वात कमी 212 रुग्ण असल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे.

महत्त्वाची बातमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Bushra Bano IPS? : 'अस्सलाम-अलैकुम' म्हटल्यामुळे IPS अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली? बंगालमधील 'त्या' व्हिडिओवरून गदारोळ

Fact Check : विराट कोहली २०२७ चा वन डे वर्ल्ड कप इंग्लंडसाठी खेळणार? भारतीय क्रिकेटला हादरवून टाकणाऱ्या वृत्तामागचे सत्य

Tata News: चंद्रशेखरन यांचा U-Turn? पुन्हा Tata चेअरमनपदी निवड! निर्णय होताच शेअर्स 5% वाढले; नेमकं काय घडलं?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमवर दुःखाचा डोंगर; लेखकाचं अकस्मात निधन, सचिन गोस्वामींची भावुक श्रद्धांजली

UPI MDR 2026 : अमेरिकेच्या दबावामुळे युपीआय वर एमडीआर? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण; जाणून घ्या नेमकं प्रकरण

SCROLL FOR NEXT