मुंबई

ठाण्यातील 'या' रुग्णालयाला कोरोनाचा विळखा; 10 वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 88 इतर कर्मचाऱ्यांना बाधा 

राहुल क्षीरसागर

ठाणे : शहरात दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांवर उपचार करणाऱ्या ठाणे महापालिकेची आरोग्य यंत्रणाच कोरोनाच्या विळख्यात सापडली असून, ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील तब्बल 51 महिला परिचारिका, 10 वैद्यकीय अधिकारी, 10 टेक्निशिअन, 15 वॉर्डबॉय, 15 सफाई कर्मचारी आणि इतर सात कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तुरळक मनुष्यबळ असतानाही रुग्णालय प्रशासनाने रुग्णांवर उपचार करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. 

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहे. तेव्हापासून या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी, टेक्निशिअन आदी कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामुळे उर्वरित मनुष्यबळावर अतिरिक्त ताण येत असून, तेथील कर्मचाऱ्यांना डबल ड्युटी करावी लागत आहे. यात कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलनही ढासळत आहे. 

दरम्यान, कळवा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने 60 वॉर्डबॉयची भरती करण्यात आली आहे, तर महिला कर्मचाऱ्यांची संख्या 144 एवढी आहे. परंतु, प्रत्यक्ष 90 कर्मचारी प्रत्यक्ष कामावर येत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी 100 बेड उपलब्ध करून द्यावेत, असा प्रस्ताव प्रशासनाने दिला आहे. मात्र, रुग्णालयात पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नसताना हा विभाग कसा सुरू करायचा, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 

महापौर, आयुक्तांपुढे मांडली व्यथा
  रुग्णालयात दाखल एका रुग्णाने महापौर आणि आयुक्तांना मेसेज करून अपुऱ्या मनुष्यबळाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. येथील कर्मचारी-अधिकारीच जर कोरोनाच्या विळख्यात असेल तर ते रुग्णांवर काय उपचार करणार, असा सवाल या रुग्णाने विचारला आहे. कळवा रुग्णालय कोव्हिड रुग्णालय नसतानाही येथील आयसोलेशन वॉर्डमुळे कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. तसेच इतर आजाराच्या रुग्णांना येथे उपचार मिळणेही कठीण झाले आहे. येथील शस्त्रक्रिया विभागही बंद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह रुग्णांचे हाल येथे सुरू असल्याची व्यथा या रुग्णाने महापौर आणि आयुक्तांपुढे मांडली आहे.

रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी काही प्रमाणात बरे होऊन कामावर रुजू होत आहेत. त्यात नुकताच महापालिकेकडून वॉर्डबॉय उपलब्ध झाल्यामुळे त्यांची संख्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु, परिचारिकांची संख्या अपुरी असल्याने उपस्थित परिचारिकांवर कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे परिचारिकांची संख्या वाढवून मिळावी यासाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे.
- डॉ. प्रतिभा सावंत, अधिष्ठाता 
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

SCROLL FOR NEXT