corona in dharavi 
मुंबई

धारावीत कोरोना रुग्णांचा उच्चांंक; एका दिवसात रुग्णांची संख्येत मोठी वाढ

सकाळवृत्तसेवा

मुंबई, ता. 26 : धारावीत कोरोना बाधित रुग्णांनी उच्चांंक गाठला असून रविवारी एका दिवसात 34 नवे बाधित रुग्ण सापडले. धारावीत एका दिवसात आज पर्यंत सापडलेल्या रुग्णांपैकी हा आकडा सर्वाधिक आहे.

धारावीतील परिस्थिती दिवसेंदिवस दिवस चिंताजनक बनत चालली असून आज एका दिवसात 34 नवे रुग्ण सापडल्याने कोरोना रुग्णांची संख्या 275 वर पोहोचली आहे. त्यामुळे धारवीकरांची चिंता अधिक वाढली आहे. आज सापडलेल्या नव्या रुग्णांमध्ये 19 पुरुष आणि 15 महिलांचा समावेश आहे. 

धारावीतील  सर्वच परिसरात हे रुग्ण सापडले आहेत. यातील अधिकतर रुग्ण हे आधी सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील रुग्ण असल्याचे समोर आले आहे. पालिकेने सुरु केलेल्या हेल्थ कॅम्प आणि सर्वेमधून हे रुग्ण सापडले आहेत.

मृतांचा आकडा स्थिर
धारावीतील रुग्णांनी उच्चांंक गाठला असला तरी मृतांचा आकडा स्थिर आहे. आजपर्यंत धारावीत 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दादर आणि माहीम मध्ये सलग दुसऱ्या दिवशी देखील एकही बाधित रुग्ण सापडलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT