covid hospital
covid hospital 
मुंबई

तब्बल चार दिवसांनी मिळाला बेड; वाचा कोणाबाबत घडला हा प्रकार...

अनिश पाटील

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होत असली तरीही दररोज सरासरी 1200 ते 1300 रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता राज्यातील अनेक ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात आल्या. अनेक तुरुंगातील कच्च्या कैद्यांची सुटका करण्यात आली, तर काही तुरुंगात पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, तरीही राज्यातील काही तुरुंगातील कैद्यांना कोरोनाची लागण झालीच. अशाचप्रकारे बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलांनाही कोरोना झाल्याचे समोर आले.

मुंबईतील डोंगरी बालसुधारगृहातील 16 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत डोंगरी सुधारगृहातील पाच मुलांना कोरोनाची लागण झाली.  मुलीला कोरोनाची गंभीर लक्षणे नसले तरी गंभीर बाब म्हणजे या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात बेड उपलब्ध होण्यास चार दिवसांचा कालावधी लागल्याचे समोर आले.

आईच्या मृत्यूनंतर वडील या मुलीची देखभाल करत नव्हते. त्यामुळे ती घरातून पळाली होती. लॉकडाऊनच्या काळात भोईवाडा येथे ही मुलगी एकटी फिरत असल्याचे आढळल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या सुरक्षेसाठी तिला डोंगरी बालसुधारगृहात पाठवले. आठ जुलैला तिला सुधारगृहात आणण्यात आले. त्यावेळी तिची चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल 11 जुलैला प्राप्त झाला असून त्यात तिला कोरोनाचे लागण झाल्याचे निष्पन्न झाले. मुलीला कोरोनाची गंभीर लक्षण नसून थोडा ताप व घशात दुखत असल्याचे सांगितले.

या मुलीसाठी रुग्णालयात उपलब्ध बेड्सची माहिती घेतली. त्यावेळी कोठेच बेड्स उपलब्ध नव्हते. तोपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून मुलीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यानंतर 14 जुलैला जीटी रुग्णालयात जागा उपलब्ध झाल्यानंतर तिला भरती करण्यात आले. या मुलीची प्रकृती सध्या ठीक असल्याचे डोंगरी बालसुधारगृहाचे अधीक्षक राहुल कांठीकर यांनी सांगितले.

सध्या डोंगरी 110 अल्पवयीन मुले आहेत. त्यात घरातून पळालेले, सुटका केलेले बाल कामगार, विधीसंघर्षग्रस्त मुलांचा समावेश आहे. यापूर्वी बालसुधारगृहातील 4 मुलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी सर्वांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या बालसुधारगृहात मुलांना दाखल करण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी केली जाते.
---
(संपादन : ऋषिराज तायडे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT