मुंबई

धारावीत कोरोनाचा आकडा वाढताच; परिस्थिती नियंत्रणात नाहीच...

सकाळ वृत्तसेवा



मुंबई : धारावीतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत नाही. धारावीत दिवसभरात तब्बल 33 नवे रुग्ण सापडले असून, बाधितांची संख्या 665 वर पोहोचली आहे. माहीममध्ये 9 आणि दादरमध्ये 2 नवे रुग्ण आढळले आहेत.
धारावीत मंगळवारी कोरोनाचे 33 नवे रुग्ण सापडल्याने बाधितांची एकूण संख्या 665 झाली. नव्या रुग्णांमध्ये 15 पुरुष आणि 18 महिला आहेत. कोरोनाने धारावीत आतापर्यंत 20 बळी घेतले आहेत.

धारावीतील कोव्हिड-19 विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. आतापर्यंत 83 हजार 500 नागरिकांचे स्क्रीनिंग झाले असून, 2380 जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. एकूण 196 रुग्ण बरे झाले आहेत.

माहीम, दादरमध्ये 11 नवे रुग्ण
माहीम आणि दादरमध्ये अनुक्रमे 9 आणि 2 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे माहीममधील रुग्णांची संख्या 80 झाली असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. दादरमधील रुग्णांची संख्या 56 झाली असून, मृतांचा आकडा 4 झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT