corona
corona 
मुंबई

धक्कादायक..! मुंबईत संशयितांकडून आरोग्य यंत्रणेची दिशाभूल  

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या भीतीपोटी, तसेच आपली ओळख उघड होईल, या शंकेने कोरोनाचे संशयित रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय चुकीची वैयक्तिक माहिती देत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. जवळपास 50 टक्के नागरिकांनी चुकीचा संपर्क क्रमांक आणि पत्ता दिल्याने त्यांना शोधण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागत असल्याची चिंता नायर रुग्णालयातील विशेष आरोग्य अधिकारी आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल राख यांनी व्यक्त केली आहे. 

कोरोना सुरुवातीच्या टप्प्यात असताना बाधित देशातून विमानतळावर आलेल्या व्यक्तींना सक्तीने 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले. दरम्यान, आरोग्य यंत्रणेकडून त्यांची वैयक्तिक माहिती आणि पत्ता नोंदवला गेला. क्वारंटाईनच्या काळात त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, नायर रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेकडे आलेल्या यादीतील 1500 रुग्णांपैकी जवळपास 650 ते 700 जणांचे संपर्क क्रमांक चुकीचे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोनाबाबत नागरिकांमध्ये गांभीर्यच नसल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, कोरोनाच्या रुग्णांना ट्रेसिंग आणि लक्षणांबाबत माहिती देण्यासाठी उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकार आणि पालिकेकडून हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनचे समन्वयक आणि नायर रुग्णालयातील विशेष आरोग्य अधिकारी आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल राख यांनी ही माहिती दिली. 

मुंबईसह राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी पातळीवर वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात असताना नागरिक अद्यापही कोरोनाबाबत गंभीर नाहीत. एकीकडे शहरात कोरोनाचा समूह संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांना शोधून त्यांना नजीकच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात जाऊन निदान करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच रुग्णालयात दाखल झालेल्या बाधितांच्या नातेवाईकाला वा अन्य कोणाला संसर्ग झाल्याची पडताळणी केली जाते. त्यावेळीही रुग्णांकडून नातेवाईकांची खोटी माहिती दिली जात असल्याचे डॉ. राख यांनी सांगितले. 

कोरोनाची भीती न बाळगता उपचार घ्या 
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी स्वत: पुढे यावे आणि माहिती द्यावी, उपचार घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांकडून केले जात आहे. तरीही नागरिक पुढे येत नसून या आजाराच्या भीतीमुळे आपली चुकीची माहिती देत आहेत. राज्य सरकार आणि पालिकेने कोरोनाची लक्षणे जाणवणाऱ्यांसाठी आणि कोरोनाबाधितांसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. हेल्पलाईनवर दरदिवशी कोरोनासंबंधित शंका असणारे हजार ते पंधराशे कॉल्स येतात. एकीकडे ही हेल्पलाईन उपयुक्त ठरत असताना कोरोना बाधित व्यक्ती किंवा त्यांचे नातेवाईक त्यावर खोटी माहिती देत आहेत. त्यामुळे संशयित व्यक्ती किंवा त्यांच्या नातेवाईकांना शोधून काढणे आरोग्य यंत्रणेसाठी कठीण जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कसलीही भीती वा शंका न बाळगता उपचारांसाठी पुढे यावे, असे आवाहन नायर रुग्णालयातील विशेष आरोग्य अधिकारी आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल राख यांनी केले आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT