चीनमधून परतला, अन्‌ त्याला भरली कोरोनाची धडकी! 
मुंबई

चीनमधून परतला, अन्‌ त्याला भरली कोरोनाची धडकी!

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : जगभरात खळबळ माजवलेल्या कोरोना विषाणूमुळे उरणच्या एका तरुणालाही अक्षरशः धडकी भरली होती. चीनमधून भारतात परतल्यानंतर त्याच्या मनात कोरोना विषाणूची लागण झाल्याची भीती होती. त्यामुळे घाबरलेल्या या तरुणाच्या नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने कस्तुरबा रुग्णालयामार्फत विविध चाचण्या करून घेतल्या; मात्र या चाचणीनंतर त्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याने सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

उरणमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहणारा एक 30 वर्षांचा तरुण चीनमध्ये शंनझेन नावाच्या शहरात शिक्षण घेण्यासाठी गेला होता; मात्र सध्या कोरोनाचा उद्रेक झालेल्या वुहान शहरापासून जवळच्या अंतरावर तो राहत होता. जानेवारी महिन्याच्या दरम्यान कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यानंतर सरकारच्या आदेशानंतर हा तरुण फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चीन सोडून मायदेशी परतला. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याची पहिली थर्मल चाचणीही करण्यात आली. ही चाचणी नकारात्मक आली; मात्र हा तरुण उरणला आपल्या घरी पोहोचल्यावर त्याला कोरोना विषाणूची लागण तर झाली नाही ना? ही भीती मनात भरली होती. या भीतीमुळे त्याचे अंग थरथरले होते. मनात कोरोना विषाणूची दहशत असल्यामुळे पुरता घाबरलेल्या या तरुणाने तत्काळ उरणच्या आरोग्य विभागामार्फत नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला. कोरोना विषाणूचे नाव ऐकून महापालिकेचे आरोग्य विभागातील डॉक्‍टर जरा दचकले, परंतु प्रत्यक्षात तरुणाची भेट झाल्यावर तो घाबरलेला पाहून त्याचे समुपदेशन केले. 

विशेष कोरोना विभागात दाखल 
कोरोनाच्या भीतीमुळे घाबरून गेलेल्या या तरुणाच्या मनाची समजूत होत नसल्याने अखेर त्याला सरकारने कस्तुरबा रुग्णालयात सुरू केलेल्या विशेष कोरोना विभागात दाखल केले. या ठिकाणी त्या तरुणाच्या सर्व चाचण्या पार पडल्या, परंतु चाचणीनंतर आलेल्या अहवालात त्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याने सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Airport : दिल्ली विमानतळावर ATCमध्ये मोठा बिघाड, ९०० विमानांना विलंब तर २० उड्डाणे रद्द; ३६ तासांनतर काय आहे परिस्थिती?

Shirol election: महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट रिंगणात; दत्तवाड मतदारसंघात बंडखोरीची चिन्हे!

Pune : अपघातानंतर डोकं BRT स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं, धक्कादायक VIDEO VIRAL

Kolhapur Road Work : कोल्हापुरातील रस्त्यांची कामे खराब केल्याने चार अभियंत्यांची वेतनवाढ रोखली, आयुक्तांच धाडसी पाऊल

IND vs SA Test: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! उपकर्णधार रिषभ पंत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी जखमी; पाहा Video

SCROLL FOR NEXT