मुंबई

कोरोनावरील लस वितरणाचे नियोजन सुरू, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना प्राथमिकता

मिलिंद तांबे

मुंबई: कोरोना विषाणूवरील लस विकसित करण्याचे काम वेगाने सुरू असून जुलैमध्ये ही लस उपलब्ध होऊ शकते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची माहिती दिल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबईतील लस वितरणाचे नियोजन सुरू केले आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना प्राथमिकता मिळण्याची शक्यता आहे. 

लस वितरित करण्यासाठी पालिका शहरातील खासगी आणि प्रशासकीय रुग्णालयांची मदत घेईल असे सांगितले जाते. तसेच लसी पाठवण्यासाठी नागरी संस्थांचे क्लिनिक, आरोग्य केंद्र आणि प्रसुतीगृहातील स्थापित वितरण व्यवस्थेचा उपयोग केला जाईल. महापालिकेच्या अंदाजानुसार एकूण लोकसंख्येपैकी 30 टक्के लोकसंख्येत आरोग्यसेवा कर्मचारी, अग्रभागी कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना पहिलं प्राधान्य दिले जाईल.

पालिकेच्या "माझे कुटूंब, माझी जबाबदारी" या घराघरातील सर्वेक्षणाने पालिकेला कोविड19 मधील अनेक ज्येष्ठ नागरिकांची ओळख पटवण्यात मदत झाली. या सर्वेक्षणातून सुमारे दहा लाख ज्येष्ठांची तपासणी करण्यात आल्याची माहिती नागरी संस्थेने दिली. त्यांच्यासाठी ही लस उपलब्ध कऱण्यास प्रथमिकता दिली जाईल.  शिवाय पालिकेचे सर्वेक्षण संपल्यानंतर साधारणता ऑक्टोबरच्या अखेरीस लस वितरणासाठी रणनीती आखण्यास सुरूवात केली जाईल. 

लस येण्यास थोडा वेळ लागू शकतो पण माझे कुटूंब, माझी जबाबदारी कार्यक्रम संपल्यानंतर नोव्हेंबरपासून आपले वितरणाचे नियोजन सुरू करू असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. सर्वेक्षणानुसार ज्या व्यक्तीला अधिक गरज असेल अशा व्यक्तींना प्रथम लस घेणे आवश्यक आहे. तर इतर वयोगटासाठीचे नियोजन आठवड्यातून एकदा केलं जाऊ शकतं. जेव्हा केव्हा ही लस येईल तेव्हा आम्ही आमच्या नागरिक आरोग्य सुविधा आणि खासगी आरोग्य सेवा संस्थांच्या मदतीने 15 दिवसांच्या आत लस देऊ शकतो असे ही ते पुढे म्हणाले.

केंद्र तसेच राज्य अधिकाऱ्यांनी नवीन मार्गदर्शक सूचना प्रकाशित केल्यामुळे लस वितरणासाठीचे धोरणं नागरी संस्थांना बदलावी लागत आहेत. सध्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या जेनर इन्स्टिट्यूटमधील लसीची चाचणी मुंबईतील केईएम रूग्णालयात सुरू आहे. फार्मा दिग्गज अॅस्ट्रॅजेनेका देखील या विशिष्ट लसिच्या विकासात सहभागी आहे. लसीचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून पुढील आठ महिन्यात लस उपलब्ध होईल असा अंदाज वर्चवण्यात येतोय.

----------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

corona vaccine distribution prioritizing senior citizens medical staff

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lonar Lake : अहो आर्श्चयम! लोणार सरोवरात आढळले चक्क मासे, दुर्मिळ जैवविविधता धोक्यात...

Pune: चेंजिंग रूमपासून ते मोबाईल चार्जिंगपर्यंत सुविधा... पुण्यात स्मार्ट सार्वजनिक शौचालये बांधणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या...

तुळशीच्या लग्नानंतरच लग्नांचा शुभ मुहूर्त का सुरू होतो? जाणून घ्या कारण!

IND vs AUS, Viral Video: मैदानात शुभमन गिल बॅटिंग करत होता अन् कॅमेरा वळाला सारा तेंडुलकरकडे, पाहा कशी होती रिअॅक्शन

World Cup 2025 साठी शफाली वर्मा भारतीय संघातही नव्हती, पण नशीबनं संधी दिली अन् तिने फायनलमध्ये मैदान गाजवलं; पण शतक थोडक्यात हुकलं

SCROLL FOR NEXT