मुंबई

धक्कादायक! राज ठाकरेंच्या घरात कोरोनाची एन्ट्री

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लॅाकडाउन शिथिल केल्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना आता राजकीय व्यक्तीच्या घरापर्यंत पोहचला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरात काम करणाऱ्या दोन जणांचा कोराना तपासणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली. याआधी राज ठाकरे यांच्या दोन वाहन चालक, दोन सुरक्षा रक्षकांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती स्थिर आहे.  या पार्श्वभूमीवर त्यांच्या घरात काम करणारे कर्मचारी काळजी घेत होते. ठाकरे कुंटुबियांनी देखील बाहेर जाणे टाळलं आहे. 

देशभरात अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर हे तिन्ही नेते बरे होऊन सुखरूप बाहेर पडले आहेत. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याजवळील एका चहा विक्रेत्यांला कोरोनाची लागण झाली होती. तर शिवसेना भवनात येणाऱ्या एका व्यक्तीचा कोराना अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते अभिषेक संघवी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यांना स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. संघवी यांच्या निकवर्तीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. याआधी काँग्रेस नेते संजय झा हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघवी यांना ताप आला होता. त्यांच्यात कोरोनासारखी लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात संघवी हे पॉझिटिव्ह आढळले. संघवी यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे.

यानंतर संघवी यांचा मुलगा आणि कुटुंबातील इतर सदस्य व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यांच्या चाचणीचे अहवाल अद्याप मिळालेले नाहीत. संघवी यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे.  याआधी काँग्रेस नेते संजय झा हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. झा यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. ते आता कोरोनातून बरे झाले आहेत. झा यांच्यानंतर संघवी हे कोरोनाची लागण झालेले दुसरे काँग्रेस नेते ठरले आहेत.

नुकतेच दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती मधल्या काळात खूप बिघडली होती. आता त्यांची प्रकृती सुधारली आहे. त्यांच्या आज झालेल्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून, लवकरच त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT