Corona patient had to walk  
मुंबई

केडीएमसीच्या हलगर्जीपणाचा कळस...कोरोनाबाधितावर चालत रुग्णालय गाठण्याची नामुष्की!

सुचिता करमरकर

कल्याण : मुंबईमधील एका सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोना झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवली पश्चिमेत समोर आला आहे. दरम्यान, चार जणांनी या कोरोनाबाधित तरुणाला संरक्षण देत शास्त्रीनगर रुग्णालयात गुरुवारी दुपारी बारा वाजता दाखल केले.

हा प्रकार म्हणजे पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा कळस असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते बाळा म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. या रुग्णाला दाखल करण्यासाठी आणत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे. 

मुंबईतील सरकारी दवाखान्यात वॉर्डबॉय म्हणून काम करणाऱ्या या युवकाने दोन दिवसांपूर्वी कोरोना तपासणी करून घेतली होती. बुधवारी सायंकाळी या रुग्णाचा अहवाल कल्याण-डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर कोव्हिड रुग्णालयात आला. मात्र तेथून या युवकाला कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नव्हती.

ज्या लॅबमधून या युवकाने आपली तपासणी करून घेतली, तेथून गुरुवारी सकाळी फोनवरून त्याला त्याच्या अहवालाची माहिती देण्यात आली. त्यानंतर युवकाने रुग्णवाहिकेसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात फोन केला. एका तासात रुग्णवाहिका मिळेल, असे प्रथम सांगण्यात आले. मात्र, दोन तास उलटल्यानंतरही रुग्णवाहिका न आल्याने या युवकाने त्याच परिसरात राहणाऱ्या बाळा म्हात्रे यांना फोन करून परिस्थिती सांगितली. 

म्हात्रे यांनीही शास्त्रीनगर रुग्णालयात फोन करून रुग्णवाहिकेची मागणी केली. त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. जर रुग्ण चालत शास्त्रीनगरला पोहोचू शकत असेल तर त्याला घेऊन या, असेही म्हात्रे यांना सांगण्यात आले.

त्यानुसार ॲड. गणेश पाटील, मनोज वैद्य, संदीप सामंत, राजा चव्हाण, योगेश भोईर यांच्यासह बाळा म्हात्रे यांनी रुग्णाला चारही बाजूने संरक्षण देत शास्त्रीनगर रुग्णालयात बाराच्या सुमारास दाखल केले. त्यानंतरही या रुग्णाला तब्बल तीन तास रुग्णालयात बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर त्याला टाटा आमंत्रा येथे दाखल करण्यात आले.

आयुक्तांकडून प्रतिसाद नाही...
  कल्याण-डोंबिवली महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू लवंगारे यांना याबाबत विचारले असता त्यांनी आपल्यापर्यंत ही माहिती आली नसल्याचे सांगितले. पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पालिका प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराबाबत सर्वत्र टीका होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Latest Maharashtra News Live Updates: "सरकार संवेदनाशून्य, भाजप मराठी माणसाचा खरा शत्रू" ; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

Ashadhi Wari 2025: विठूनामाने ‘प्रवरा संकुल’चे मैदान दुमदुमले; अश्‍वरिंगण सोहळा उत्साहात, १५ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

Raju Shetti: शेतकऱ्यांच्या थडग्यावर विकासाचे मनोरे नको: राजू शेट्टी; 'शक्तिपीठ'मुळे ५५ हजार शेतकरी देशोधडीला लागणार

SCROLL FOR NEXT