पंचतारांकित ताज महल पॅलेस हॉटेलमध्ये कोरोनाचा शिरकाव  
मुंबई

पंचतारांकित ताज हॉटेलमध्ये कोरोनाचा शिरकाव

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत कोरोनाचा विळखा वाढत असताना दक्षिण मुंबईतील पंचतारांकित ताज महल पॅलेस हॉटेलमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. ताज हॉटेलमधील सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ताज महल पॅलेसमधील सहा कर्मचाऱ्यांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच ताज हॉटेलमध्ये औषध फवारणी केली जात आहे. 

मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून, एका दिवसात १३८ रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ११८२ वर पोहचला आहे. आतापर्यंत एकट्या मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या ७५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असल्याची घोषणा मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT