मुंबई

अरे वाह! मुंबईत कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत 'अशी' झाली घट

सकाळ वृत्तसेवा


मुंबई- कोरोना व्हायरसनं मुंबईत थैमान घातलं आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हायरसनं मुंबईत कहर केला आहे. या व्हायरसमधून पोलिस, डॉक्टर्स, नर्सेस, पालिका कर्मचारी यांचीही सुटका झाली नाही. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. अशातच मुंबईत आजूबाजूची परिस्थिती गंभीर असतानाही मुंबई पोलिस स्वतःचा जीव धोक्यात घालून आपलं कर्तव्य बजावाहेत. हे कर्तव्य बजावत असताना अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली तर काहींना आपल्या जीवालाही मुकावं लागलं. मात्र नुकतेच समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईत कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत घट झाली आहे.

पोलिस कर्मचारी सतत नागरिकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. म्हणूनच मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी उपाय योजना करण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी येणाऱ्यास काही नियम आणि सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत उपाय योजना करण्यात आल्या. याचाच परिणाम म्हणून पोलिस दलातील कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. 

आनंदाची बाब म्हणजे मागच्या 48 तासात पोलिस दलात एक ही कोरोनाने संक्रमित पोलिस सापडलेला नाही. कोरोनाबाधित पोलिस रुग्णांमध्ये सर्वाधिक मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांची संख्या आहे. मुंबईच्या पोलिस दलात आतापर्यंत 1871 कोरोनाबाधित पोलिसांची नोंद झाली आहे. त्यात 1612 पोलिस कर्मचारी, तर 259 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील 571 जणांना कोविड सेंटरमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर 231 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 3 जणांना घरीच क्वारंटाइन केलं आहे. 

164 पोलिसांना आताच डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. आतापर्यंत 634 पोलिस यापूर्वीच बरे झाले असून सध्या ते होम क्वारंटाइन आहेत. दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे, आतापर्यंत 219 जण पूर्णतः बरे झाले असून पुन्हा सेवेत रुजूही झालेत. मात्र दुखद बातमी म्हणजे कोरोनानं आतापर्यंत 21 पोलिसांचा बळी घेतला. 

पोलिसांचा नागरिकांशी तसंच थेट संपर्क येत असल्यानं पोलिसांमध्ये कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात फोफावल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतरच आयुक्तांनी पोलिस ठाण्यात प्रवेश करण्याआधी तक्रारदाराला सॅनिटायझरनं हात स्वच्छ करण्यात यावं. तसंच तक्रारदार तक्रार नोंदवण्यासाठी अधिकाऱ्याच्या टेबलावर गेल्यास दोघांमध्ये सुरक्षित अंतर असावे. त्याचबरोबर दोघांमध्ये पारदर्शक काच बसवण्यात आली आहे. तसंच प्रत्येक पोलिस ठाण्यात ग्लोज, मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं आहे. आयुक्तांनी दिलेल्या नियमावलीचे परिणाम आता दिसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पोलिस दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बाब आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT