मुंबई

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर ३१२ दिवसांवर, धारावीत ५ नवे रुग्ण

मिलिंद तांबे

मुंबई: मुंबईत शनिवारी 680 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे रुग्णसंख्येचा एकूण आकडा 2 लाख 90 हजार 23 झाली आहे. तर काल 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 10 हजार 969 वर पोहोचला आहे. काल 478 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2 लाख 65 हजार 760 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 92 टक्के इतका झाला आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 312 दिवसांवर गेला आहे. तर 11 डिसेंबरपर्यंत एकूण 20 लाख 77 हजार 251 कोविड चाचण्या करण्यात आल्या. 5 डिसेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.22 इतका आहे.

मुंबईत शनिवारी नोंद झालेल्या 10 मृत्यूंपैकी 9 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 5  पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे. मृत झालेल्यांपैकी 3 जणांचे वय 40 ते 60 वर्षा दरम्यान होते तर 7 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते.

मुंबईत 436 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 4 हजार 866 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 3 हजार 179 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड काळजी केंद्रात दाखल करण्यात येणा-यांची संख्या देखील वाढत असून शनिवारी कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 461 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

जी उत्तरमध्ये 15 नवे रूग्ण 

जी उत्तरमध्ये काल 15 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. धारावीमध्ये  काल दिवसभरात 5 नवीन रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 3 हजार 750 इतकी झाली आहे. तर 20 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दादरमध्ये शनिवारी केवळ 5 नवीन रुग्ण सापडला असून रुग्णांची एकूण संख्या ही 4 हजार 683  इतकी झाली आहे. तर 145 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्ये ही शनिवारी केवळ 5 नवीन रुग्णांची भर पडली असून रुग्णांची संख्या 4,467 इतकी झाली आहे. तर 254 एक्टीव्ह रूग्ण आहेत.

धारावी, दादर, माहिम परिसराचा समावेश असणाऱ्या जी उत्तर विभागात काल 15 नवीन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 12 हजार 900 वर पोहोचला आहे. तर 419 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जी उत्तरमध्ये आतापर्यंत 640 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये 3,419, दादरमध्ये 4,366 तर माहीममध्ये 4,070 असे एकूण 11 हजार 855 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

coronavirus latest updates mumbai reports 654 fresh cases doubling rate 312

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: "सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी"; पंकजा मुंडेंचं हाकेंसाठी सरकारला साकडं

T20 WC 2024 Super 8 Weather Forecast : वर्ल्ड कप जिंकण्याचे कर्णधार रोहितचे स्वप्न जाणार वाहून? 'सुपर-8'वर वरुणराजाची टांगती तलवार

Anti-Theft Feature : मोबाईल चोरांचे वाईट दिवस सुरु! गुगल आणतंय 'हे' नवीन AI फिचर,जाणून घ्या

BAN vs NEP: जरा हटकेच! कर्णधार रोहितने विकेट घेताच चाहत्याची थेट स्टेडियममधील पुलमध्ये उडी, पाहा Video

Latest Marathi Live Updates : एअर इंडियाच्या प्रवाशाला जेवणात सापडलं ब्लेड!

SCROLL FOR NEXT