mumbai corona
mumbai corona  
मुंबई

मुंबईकरांना दिलासा! रुग्ण दुपटीचा कालावधी 672 दिवसांवर

सकाळ वृत्तसेवा

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर

मुंबई: शहरात कोरोना रुग्णवाढ नियंत्रणात येत असून मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे, रुग्ण दुपटीचा कालावधी आता तब्बल 672 दिवसांवर गेला आहे. कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दरही 0.10 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 15 हजार 550 हजारांवर आला आहे. (Coronavirus Update in Mumbai Doubling Rate goes beyond 672 days)

मुंबईत आज 529 नवीन रुग्ण सापडले. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7 लाख 17 हजार 108 इतकी झाली आहे. आज 725 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 6 लाख 84 हजार 107 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 66 लाख 40 हजार 641 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत आज दिवसभरात 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 202 इतका झाला आहे. आज मृत झालेल्यापैकी 16 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 11 पुरुष तर 8 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 6 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 13 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते.

मुंबईत 21 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 77 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 5,330 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 841 करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local : गर्दुल्यांकडून मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! दिवसाढवळ्या घडला धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT