मुंबई

...तर लसीकरण थांबवण्याची वेळ आली नसती- भाजप

विराज भागवत

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना लसीकरण मोहिमेने वेग घेतला होता. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी दिवसागणिक लाखांच्या संख्येने लसीकरण केलं जात होतं. पण गेले काही दिवसांपासून राज्याकडे असलेला लससाठा संपत आल्याचे चित्र होते. त्यामुळेच राज्यातील अनेक केंद्रांवर लसीकरण थांबल्याचे दिसून आले. केंद्राकडून पाठवण्यात आलेल्या लसीच्या साठ्यांपैकी तीन लाख लसी या राखीव ठेवण्यात आल्या आणि त्यामुळेच लसीकरणाला ब्रेक लागला. तसं केलं नसतं, तर लसीकरण मोहिम थांबवण्याची वेळ आली नसती. त्यामुळे लस तुटवडा हे 'महावसुली आघाडीनिर्मित संकट' आहे, असा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला.

"महाराष्ट्रात लसीचा असलेला तुटवडा किंवा लसीचे संकट हे महावसुली आघाडी निर्मित संकट आहे. लसीकरण सुरू होऊन दोन महिने झाले. त्यामुळे या लसीकरणाचा हिशेब दिला जायला हवा. महाराष्ट्रात जे लोक पात्र होते त्यांनाच लसी दिल्या गेल्या की जे लोक निकषात बसत नव्हते अशा लोकांना लसी देण्यात आल्या याचाबद्दलची माहिती महाराष्ट्र सरकारने द्यायला हवी. पहिल्या वेळी केवळ ६० वर्षांवरील लोकांना, आरोग्यसेवकांना आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लसी देण्यात येणार होत्या. त्यावेळी काही खास, लाडक्या लोकांना लसी देण्यात आल्या का? कोणाला नियम मोडून लसी देण्यात आल्यात का? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत", असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला.

"ठाकरे सरकारने तीन लाख लसींचा साठा राखीव का ठेवला आहे? तो साठा तसा ठेवला नसता तर लसीकरण बंद ठेवावं लागलं नसतं. लसीकरण सुरू झालं तेव्हापासून नियमबाह्य पद्धतीने लसी कोणाकोणाला देण्यात आल्या? लसींबाबत नक्की कोणाला फायदा झाला? या हिशेब महाराष्ट्र सरकारने दिलाच पाहिजे", अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात वेगाने लसीकरण सुरु आहे. आवश्यकते इतक्या लसींचा पुरवठा होत नसल्याने, राज्य आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. काल मुंबईसह राज्याच्या अनेक भागात लसींचा तुटवडा निर्माण झाला होता. नागरिक मोठ्या संख्येने लसीकरणासाठी आले होते. पण रुग्णालये, लस केंद्रांवर लसी नसल्यामुळे नागरिकांना माघारी पाठवून द्यावे लागले होते. पण शनिवारी सकाळी लसीचे ९९ हजार बॉक्सेस मुंबईत येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या शोभा यात्रेत सहभागी

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

India Pakistan Nuclear Risk : भारत-पाकिस्तान अणुयुद्ध कधीही पेटू शकते, कोणी केला खळबळजनक दावा?

Panchang 19 March 2026: आजच्या दिवशी बृहस्पती कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT