couple with 3 month-old baby died after hit by a train while crossing railway track at Virar railway station  
मुंबई

Virar Train Accident : विरार स्थानकात रेल्वेने कुटुंबाला उडवलं; पती पत्नीसह तीन महिन्याच्या बाळाचा जागीच मृत्यू

Breaking Marathi News: विरार रेल्वे स्थानकात रेल्वे रुळ ओलंडणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना रेल्वेने धडक दिल्याचा भीषण प्रकार समोर आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Virar Train Accident : विरार रेल्वे स्थानकात रेल्वे रुळ ओलंडणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना रेल्वेने धडक दिल्याचा भीषण प्रकार समोर आला आहे. मृतांमध्ये एक पुरुष, महिला व तीन महिन्यांचा बाळाचा समावेश आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळ ओलांडताना वेगात येणाऱ्या मेलने तिघांना जोरदार धडक दिली.

या अपघातात महिला-पुरुष आणि तीन महिण्याच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान मृतकांची ओळख अजून पटली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

रेल्वे स्थानकावर प्रशासनाकडून रेल्वे रुळ ओलांडताना नियामांचे पालन करण्याच्या सूचना सातत्याने केल्या जातात मात्र तरी देखील नागरिकांकडून त्यांचे पालन केले जात नाही. ही चुक आजवर अनेकांच्या जीवावर बेतली आहे.

दररोज कितीतरी नागरीक चुकीच्या पध्दतीने रेल्वे रुळ ओलांडण्याच्या प्रयत्नात स्वतःचा जीव गमवतात. दरम्यान या रेल्वे अपघातात संपूर्ण कुटुंबच गेल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahar Shaikh Video: ओवैसी बंधूंसमोरच सहर शेख यांची १५ मिनिटांची भाषा; व्हिडीओ व्हायरल

Uruli Kanchan Firing Case : बारा दिवस उलटूनही गोळीबाराच्या गुन्ह्याचा तपास नाहीच? तपासावर प्रश्न चिन्ह

Latest Marathi News Update : मुंबई पोलिसांची रिक्षाचालकांविरुद्ध विशेष मोहीम; ३६ हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई

गर्दीच्या वेळी CSMT रेल्वे स्थानकात संतापजनक प्रकार! प्लॅटफॉर्ममधील रुळावर व्यक्ती झोपला, समोरून ट्रेन आली अन्...; VIDEO VIRAL

Thane Crime: ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी मोहीम, वर्षभरात ७ कोटींचा ड्रग्ज जप्त, १४६ आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT