court urgently hear case mumbai blasts accused demand of relatives accused sakal
मुंबई

Mumbai Blast : न्यायालयाने मुंबई बॉम्बस्फोटातीत आरोपींबाबत तातडीने सुनावणी घ्या; आरोपींच्या नातेवाईकांची मागणी

मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात निर्दोष व्यक्तींना अटक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात निर्दोष व्यक्तींना अटक केली आहे. ते तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. त्या व्यक्ती पूर्णपणे निर्दोष आहेत, एटीएस मुंबईने चुकीच्या पद्धतीने अटक केली आहे. बॉम्बस्फोटाला १७ वर्षे झाली असून मुंबई उच्च न्यायालयाने या आरोपीबाबत तातडीने सुनावणी घ्या अशी मागणी आरोपींच्या नातेवाईकांनी मागणी केली आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघात आज तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींच्या नातेवाईक आज एकत्र आले होते. बॉंम्ब स्फाटोतील आरोप सादीद अन्सारी याचा थोरला भाऊ खलीद अन्सारी, आरोपी जमीर शेख याचा भाऊ शरिफ शेख, आरोप मोहम्मद अली शेख याचे मुलगा मोहम्मद सोहील शेख, आरोपी नावेद खान याचा थोरला भाऊ वालिद खान, आरोपी असीफ खास याची आई हुस्न बानो आदींनी आपल्या व्यथा मांडल्या.

मुंबई उच्च न्यायालयात लवकर सुनावणी घ्या, मात्र त्याला उशीरा लावला जात आहे. आरोपी निरपराध आहेत. चुकीच्या पध्दतीने त्यांना एटीएसने अटक केली आहे. तपासात मुळ आरोपी मिळालेले नाहीत, असे आरोपी फईज शेख मुझामिल शेख यांची आई परवीन वानो कैफियत मांडली. आरोपी गेल्या ६००० दिवसांपेक्षा पेक्षा जास्त तुरूंगात आहेत. त्यांची लवकर सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली.

२००६ पासून एटीएस मुंबईच्या हातून या प्रकरणात प्रथम अटक झाल्यापासून सर्व आरोपींनी आपले निर्दोष असल्याचा दावा करीत आहेत आणि पोलिसांच्या छळ आणि अनैच्छिक कबुलीजबाब बद्दल ट्रायल कोर्टाला वारंवार माहिती दिली अशी माहिती अब्दुल वारीस शेख यांनी यांनी सांगितले. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की मुंबई उच्च न्यायालयात अपील सुरू होताच सत्य समोर येईल आणि निश्चितपणे न्यायालय यातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करेल. याप्रकरणी तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UGC NET परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या तुमचा विषय कधी आहे?

T20 World Cup साठी आज भारतीय संघाची घोषणा, कुणाला संधी, कोण बाहेर? 'या' पाच प्रश्नांची मिळणार उत्तरं...

थरारक प्रसंग! मृत्यूच्या दाढेतून परतले महसूल अधिकारी! माळशिरस महामार्गावर दोन तरुणांच्या धाडसामुळे वाचले प्राण, क्षणभर उशीर झाला असता तर...

Mumbai Mega Block : मुंबईत ब्लॉकमुळे उद्या १३ रेल्वेंवर परिणाम

Vidarbha Cold Wave: विदर्भात थंडीचा कडाका: नागपूर पारा ८.५ अंश, गोंदियेत ८ अंश सेल्सिअस

SCROLL FOR NEXT