मुंबई

चढ्या दराने थ्री फ्लाय मास्कची विक्री करणाऱ्या महिलेला अटक   

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोना संसर्गामुळे नागरिकांत दहशत असताना काही जण नफेखोरी करत आहेत. गुन्हे शाखेच्या कक्ष 10 ने वांद्रे येथे चढ्या दराने थ्री-प्लाय मास्क विकणाऱ्या रिंकू नवीन थायी (34) या महिलेला अटक केली. तिच्याकडून 22 लाख 50 हजार रुपयांचे दोन लाख 97 हजार 800 मास्क जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

यापूर्वी बेकायदा मास्कविक्रीच्या प्रकरणात गुन्हे शाखेने पाच जणांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत गुजरातमधील वापी येथे राहणारा आरोपी वांद्य्रातील रिंकू थायी हिच्या संपर्कात असल्याचे समजले. त्याने या महिलेला विक्रीसाठी मास्क दिल्याचे समोर आले होते. तपास पथकाने या महिलेला अटक करून 22 लाख 50 हजारांचे दोन लाख 97 हजार 800 थ्री-प्लाय मास्क जप्त केले. गृहिणी असलेल्या या महिलेचा पती रिअल इस्टेट एजंट आहे.

यापूर्वी एका नामांकित कंपनीत कामाला असलेली ही महिला काही वर्षांपासून बेरोजगार आहे. आर्थिक स्थिती चांगली नसल्याने 25 रुपये दराने मास्कची विक्री करत असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली.  

महत्त्वाची बातमी - 

covid 19 crisis mumbai police arrest women who was selling three ply mask at higher rates 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT