मुंबई

Crime News: कल्याण जवळ दुकानात सापडला ४ कोटींच्या एमडीचा साठा

सकाळ वृत्तसेवा

Kalyan Crime News: नेवाळी नाक्यावरील एका किराणा दुकानातून एमडी या अमली पदार्थाचा साठा पोलिसांनी शनिवारी (ता.४) जप्त केला आहे.

याची किंमत ४ कोटी ५० लाख ७० हजार रुपये इतकी आहे. त्यामुळे अमली पदार्थाचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त होण्याची शक्यता असल्याचे कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांनी सांगितले.(crime news)

नेवाळी नाका येथे एकविरा ढाब्याजवळ राजेशकुमार प्रेमचंद तिवारी याचे गायत्री नावाचे किराणा दुकान आहे. आ दुकानातून एमडी ड्रग्ज पावडरची विक्री होत असल्याची माहिती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी दुपारी पावणे एक वाजता दुकानावर छापा टाकून झाडाझडती घेतली.

या झडतीत ३ किलो ६ ग्राम एमडी ड्रग्ज पावडर आढळून आली. या ड्रग्जची किंमत ४ कोटी ५० लाख ७० हजार आहे.राजेश तिवारीला शैलेश राकेश अहिरवार याने हे ड्रग्ज पुरवले होते. याप्रकरणी दुकानदार राजेशकुमार तिवारी याला अटक करण्यात आली असून शैलेश अहिरराव यालाही अटक करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT