Crime News Businessmen knife attack man rides esakal
मुंबई

Crime News : गळ्यात खुपसलेला सूरा घेऊन रुग्णालयात, डॉक्टरांनाही बसला धक्का

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेजस पाटील असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते उद्योगपती आहेत.

युगंधर ताजणे

Crime News Businessmen knife attack man rides : नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तीस वर्षीय सानपाड्यातील उद्योगपतीला त्याच्या भावानेच जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. भाऊ झोपला असताना त्याच्या मानेत सुरा खुपसला आहे. यानंतर त्यानं भावाची दुचाकीही पळवून नेली आहे. या घटनेत मात्र उद्योगपती भाऊ गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Crime News Businessmen knife attack man rides

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेजस पाटील असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते उद्योगपती आहेत. त्यांच्या भावाकडून त्यांच्यावर गंभीर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चार तासांच्या सर्जरीनंतर पाटील हे शुद्धीवर आले आहेत. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन त्यांना जीवदान दिले आहे. डॉक्टरांनी बराच वेळ प्रयत्न करुन त्यांच्या मानेतून तो चाकू काढला आहे. त्यांच्या मानेतील रक्तवाहिन्यांना इजा झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Also Read - Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको

तेजस पाटील हे सानपाड्यातील प्रसिद्ध उद्योगपती असून त्यांच्या २८ वर्षीय लहान भावानं मोनिशनं हत्येचा प्रयत्न केल्याची बातमी टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झाली आहे. मला अजुनही काही कळालेलं नाही की त्यानं असं का केलं. तो माझ्यावर जीवघेणा हल्ला करेल असे मला वाटले नव्हते. त्यामुळे मला मोठा धक्का बसला आहे. असे तेजस यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. मोनिश हा अल्कोहोलिक आहे. त्याला दारु मिळाली नाहीतर त्याची मानसिक स्थिती बिघडते. असेही तेजस यांनी म्हटले आहे.

यापूर्वी मी मोनिशला माझ्या पाण्याच्या टँकर व्यवसायात पार्टनर म्हणून घेतले होते. पण त्याची काम करण्याची पद्धत मला आवडली नाही. त्याच्याविषयी खूप तक्रारीही होत्या. त्यामुळे आमची पार्टनरशिप फार काळ चालली नाही. मला तो उद्योग बंद करावा लागला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, मोनिशवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सानपाडा पोलीस करत आहेत.

तेजसवर हल्ला झाल्यानंतर तो मानेत सूरा असलेल्या अवस्थेत रुग्णालयात पोहचला. अशा अवस्थेत त्याला डॉक्टरांनी पाहिल्यावर त्यांनाही तो अजुनही जिवंत कसा हाच प्रश्न पडला. त्यांनी चार तास त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन तो सूरा मानेतून काढला. आता तेजस यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT