baby  
मुंबई

'त्या' नवजात मुलीच्या आईचा लागला शोध, उघड झालं 'सत्य'..

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

ठाणे : शीळ डायघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक सापडल्याची घटना घडली होती. लॉकडाऊन काळात या अर्भकाच्या पालकांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. परंतू दोनच दिवसांत पोलिसांनी या घटनेचा तपास लावला असून याप्रकरणी नवजात मुलीच्या मामाला अटक केली असल्याची माहिती शिळ डायघर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक आर. के. मोहीते यांनी दिली. 

कल्याण शीळ रोडवर शनिवारी दुपारी एक दिवसाचे स्त्री जातीचे जिवंत अर्भक आढळून आले होते. भर पावसात या मुलीला पालक असेच रस्त्याच्या कडेला कचऱ्यात सोडून गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होती. या नवजात मुलीच्या पालकांचा लॉकडाऊन काळात शोध घेण्याचे आव्हान कल्याण शीळ डायघर पोलिसांसमोर होते. परंतू अवघ्या दोनच दिवसांत पालकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या मुलीची आई मानपाडा हद्दीत राहणारी असून सध्या तिच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती ठिक होताच तिच्यावर ज्युवेनाईल कोर्टात केस दाखल करण्यात येईल अशी माहिती कल्याण शीळ डायघर पोलिसांनी दिली. 

शनिवारी सापडलेले नवजात अर्भकाच्या आईचा शोध लागलेला आहे. अर्भकाची आई अल्पवयीन असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नवजात मुलीचा भाऊ यास अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी मानपाडा पोलिस ठाणे हद्दीत रहाण्यास असल्याने पुढील तपास मानपाडा पोलिस करीत आहेत. 
- आर. के. मोहिते, पोलिस निरिक्षक, शीश डायघर पोलिस स्टेशन

(संपादन : वैभव गाटे)

crime news the mom of a newborn girl was find by police

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT