crime 
मुंबई

कोरोनाच्या फैलावानंतर मुंबईतील गुन्ह्यांमध्ये 67 टक्‍क्‍यांनी घट 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईतील गुन्हेगारीचे प्रमाण 67 टक्‍क्‍यांनी घटले आहे. सरकारी आकडेवारीनुसार मार्चमध्ये मुंबईत 1100 गुन्ह्यांची नोंद झाली. मागील वर्षी मार्चमध्ये 3368 गुन्हे नोंदवण्यात आले होते. 

कोरोनाच्या संकटाचा धसका गुन्हेगारांनीही घेतला आहे. अनेक गुन्हेगारांनी मुंबई सोडली असून, अनेक जण घरातून बाहेर पडत नाहीत. मार्चमधील 1100 प्रकरणांपैकी बहुतेक कलम 188 च्या उल्लंघनाची म्हणजे लॉकडाऊन न पाळल्याची आहेत. 2019 मध्ये एकूण 41 हजार 933 गुन्हे नोंदवण्यात आले, त्यापैकी बहुतेक प्रकरणे चोरीची होती. 

सध्या नागरिक रस्त्यांवरच येत नसल्याने सोनसाखळी चोरी, भांडणे, खून, अपघात असे गुन्हे अत्यंत कमी झाले आहेत. लॉकडाऊनचे उल्लंघन होऊ नये म्हणून पोलिस कठोर कारवाई करत आहेत. लहान गुन्ह्यांमध्ये अटक पुढे ढकलली जात आहे. गंभीर नसलेल्या प्रकरणांत जामिनाला विरोध केला जात नाही. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी 67 टक्‍क्‍यांनी घटल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. 

आकडा शून्यावर : 
गेल्या वर्षी मार्चमध्ये चोरीचे 484 गुन्हे नोंदवण्यात आले, परंतु या मार्चमध्ये हा आकडा जवळपास शून्यावर आला आहे. गर्दीच्या ठिकाणी सोनसाखळी चोरी, मोबाईल-पर्स-बॅग-पाकिटे पळवण्यासारखे गुन्हे घडतात. लॉकडाऊनमुळे गर्दी होत नसल्याने चोरीचे गुन्हे घटले आहेत. नागरिक दिवस-रात्र घरातच असल्यामुळे घरफोड्याही होत नाहीत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivraj Motegavkar Son Inquiry : नीट पेपरफुटी प्रकरण; शिवराज मोटेगावकरच्या मुलाची CBI चौकशी, आणखी तीन विद्यार्थ्यांना घेतलं ताब्यात

Electricity Rate: वीज ग्राहकांना मोठा दिलासा! वीजदरात कपात; दिवसा वीज वापरणे स्वस्त होणार, किती दर कमी केले?

NEET पेपरफुटीचं प्रकरण; पुण्यानंतर सीबीआयचं पथक नागपुरात, तीन विद्यार्थ्यांची झाडाझडती़, मोठा मासा गळाला लागणार?

Viral Video: 'अरे हा किती म्हातारा दिसतोय' गोविंदाचं वाढलेलं वय आणि पडलेले दात पाहून नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला कंटाळून सुधाकर भारसाकळे यांचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT