Cyber_crime
Cyber_crime 
मुंबई

लॉकडाऊनमध्ये मुले बळी पडतायत 'या' घटनांना; अभ्यासाकडेही होतंय दुर्लक्ष 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुलांचे मोबाईल आणि सोशल साईट्सवर राहण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे, सायबर क्राईमच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. सायबर क्राईमच्या घटनांमध्ये 48 टक्के मुले शिकार बनत आहेत. तर, यात मुलींचे प्रमाण 27 टक्क्यांवर आहे. शिवाय, 46 टक्के विद्यार्थी अभ्यासापेक्षा गेम्सला सर्वात जास्त प्राधान्य देत आहेत.  

विशेष म्हणजे, सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकणाऱ्या मुलांमुलीपैकी केवळ 19 टक्के जणच त्याची माहिती आपल्या पालकांना किंवा इतरांना देत असून उर्वारित 81 टक्के सायबर क्राईम संदर्भातील माहिती लपवत असल्याचे अहवालातून समोर आले आहे. राज्यभरातील विद्यार्थी इंटरनेचा वापर नेमका कसा करतात? याबाबत रिस्पॉन्सिबल नेटिझमने नुकतेच एक सर्वेक्षण केले होते. सायबर पीस या फाऊंडेशन, एम. एस. सी. ई. आर. टी आणि इतर संस्थांच्या मदतीने हा अहवाल तयार करण्यात आला. 

मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, चंद्रपूर, नंदुरबार या जिल्ह्यांमधील 18 शाळांमधील 1 हजार 152 विद्यार्थ्यांच्या मदतीने हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या एकूण विद्यार्थ्यांपैकी चार मुले वगळता 1 हजार 148 मुलांनी या पाहणीमध्ये प्रत्यक्षात भाग घेतला होता. या अहवालाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडे सूचना पाठवण्यात आल्या असल्याची माहिती रिस्पॉन्सिबल नेटिझमचे उन्मेश जोशी यांनी दिली आहे. 

या अहवालानुसार 23 टक्के विद्यार्थी हे आपल्या मोबाईल किंवा इतर डिवाईसवर अवलंबून असल्याची माहिती समोर आली आहे. तर 46 टक्के विद्यार्थी आपल्या अभ्यासापेक्षा गेम्स खेळण्यास प्राधान्य देत असल्याची माहिती ही यावेळी समोर आली आहे. तर 21 टक्के विद्यार्थी आपल्या पालकांच्या परवानगी शिवाय मोबाईलमध्ये गेम्स डॉऊनलोड करत असल्याचे विद्यार्थ्यांनी मान्य केले आहे. अहवालानुसार मुलींपेक्षा मुले जास्त वेळ फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंग साईटवर घालवत असल्याने हे प्रमाण अधिक असल्याचे यात अधोरेखित केले आहे. 

मोठी बातमी - 120 कोरोना रुग्णांना दिलं 'हे' औषध त्यातले 108 झालेत बरे; जाणून घ्या कोणतं आहे 'हे' औषध​

14 वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश
या अहवालानुसार एकूण 158 मुलींना सायबर क्राईमला सामोरे जावे लागले असून मुलांमध्ये हेच प्रमाण 270 आहे. तर, वयोगटानुसार 14 वर्षे वय असणाऱ्या विद्यार्थी अधिक प्रमाणात सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकत आहेत. तर फेसबुक वापरणाऱ्या एकुण मुलांपैकी 17 टक्के विद्यार्थी ऑनलाइन गेम्बलिंग, आक्षेपार्ह व्हिडीओ किंवा फोटो, पोर्नोग्राफीला बळी पडणे सारख्या सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकत आहेत. तर, 26 टक्के विद्यार्थी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर अ‍ॅकाऊंट हॅकिंगच्या जाळ्यात अडकत असल्याचे समोर आले आहे.

वयोगट सायबर क्राईममध्ये न अडकणारे सायबर क्राईममध्ये अडकणारे
11 92 23 
12 165 81
13 213 121
14 181 134
15 68 70

अहवालात समोर आलेल्या अनेक बाबी चिंता करण्यासारख्या आहेत. त्यामुळे या सगळ्यांची गंभीर दखल घेऊन सरकारने सायबर सेफ्टी हा विषय शालेय अभ्यासक्रमात लवकरात लवकर समावेश करावा. जेणेकरुन मुलांना याबद्दल जागृती निर्माण होईल त्याशिवाय यासंदर्भात मूलभूत शिक्षण मिळण्यास देखील मदत होईल.
- उन्मेश जोशी, रिस्पॉन्सिबल नेटिझम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT