मुंबई

मुंबईकरांनो सावधान ! ३ जूनला चक्रीवादळ महाराष्ट्र किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईमध्ये सध्या जरी उन्हाने काहिली होत असली, येत्या 24 तासात विजेच्या कडकडाटसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळामुळे मुंबईत 3 व 4 जूनला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यात मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाने मुंबईसह राज्यातील पूर्वानुमान नोंदवले. त्यानुसार 3 व 4 जून पालघरमध्ये अति मुसळधार तर मुंबई, ठाणे, रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. येत्या 24 तासात हा कमी दबाचा पट्टा अधिक तीव्र होऊन त्यांचे रुपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे. हे वादळ उत्तरेच्या दिशेने मार्गक्रमण करून त्यानंतर 3 जून रोजी उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्याला धडकू शकते, अशा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. रविवारी मुंबईतले हवामान कोरडे होते.

रविवारी सकाळी किमान तापमानाची कुलाबा येथे 29.5 अशी नोंद करण्यात आली. रविवारी मुंबईकरांच्या शरिरातून घामा वाहत होत्या. त्यापूर्वी कुलाबा येथे  मे महिन्यात 2010 मध्ये 29.7 अंश सेल्सिअस , 2015 मध्ये 29.7 आणि 2016 मध्ये 29.2 अंश सेल्सिअस अशी नोंद झाली आहे. त्यामुळे रविवारचे सकाळी कुलाबा येथे नोंदवण्यात आलेले किमान तापमान  मागील दहा वर्षातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान होते. 

चक्री वादळाच्या प्रभावामुळे मुंबईत 1 व 2 जून विजेच्या कडकडाटसह पाऊस पडण्याची शक्यात आहे. तर 3 व 4 जूनला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात लक्षद्वीप आणि त्याजवळील समुद्र खवळलेला राहिल. 2 जून रोजी कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्राचा किनाराजवळ उंच लाटा उसळण्याची शक्याता आहे.  3 जून रोजी गुजरात व महाराष्ट्र किनाऱ्याजवळील समुद्र खवळलेला राहिल. त्यामुळे या कालावधघीत मच्छिमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये.

खोल समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी आपल्या बोटीसह किनाऱ्याला परतण्याची सूचना हवामान विभागाने दिली आहे.

cyclone may hit maharashtra coast region heavy rain expected on 3rd and 4th junethird june

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT