कारमधील डीजेच्या तालावर भर रस्त्यात नाचले; पोलिस आले अन्‌...  
मुंबई

कारमधील डीजेच्या तालावर भर रस्त्यात नाचले; पोलिस आले अन्‌...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विलेपार्ले पूर्व परिसरात लॉकडाऊन असतानाही स्कॉर्पिओ वाहनामधील साऊंड मोठ्या आवाजात करून रस्त्यावर नाचणे सहा जणांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी कारवाई करत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील स्कॉर्पिओ वाहनही जप्त करण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस करीत आहे.

एकीकडे लॉकडाऊन असताना सोशल डिस्टन्सच्या पालन करण्यासाठी पोलिस जनजागृती करीत असतानाच स्कॉर्पिओ वाहनातील साऊंड सिस्टीम वाजवून भर रस्त्यात नृत्य करत असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याची गंभीर दखल विलेपार्ले पोलिसांनी घेतली. या घटनेतील स्कॉर्पिओ (क्रमांक MH02/CX/8055)चा वाहनचालक श्रीकांत अशोक जाधव (32) याला पोलिस ठाण्यात आणून चौकशी केल्यानंतर त्याने पाच सहकाऱ्यांसमवेत सुभाष रोड येथे रात्री 1 वाजता नृत्य केल्याचे सांगितले. 

या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी क्रमांक 222/20 कलम 188 269 भारतीय दंड विधान सह कलम 51(ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम सह कलम 11 महाराष्ट्र 19 उपायोजना अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT