मुंबई

दक्षिण रायगडमधील जंगलात असं काही घडतंय... 

देवेंद्र दरेकर

 पोलादपूर : दक्षिण रायगडचा भाग दुर्गम वाड्या- वस्त्यांचा. त्यामुळे या भागात अनेक श्‍वापदांचा वावर असतो. परंतु एरवी त्यांचे दर्शन फारसे होत नसे. आता लॉकडाऊनमुळे शांतता वाढली असल्याने त्यांचा मुक्त वावर सुरू झाला आहे. काही दिवसांपुर्वी पोलादपूर तालुक्‍यातील जंगलात रानडुकरांनी तीन ग्रामस्थांवर हल्ला केला. आतामहालगुर येथे बिबट्याचा मुक्त संचार आहे. त्यामुळे भीती व्यक्त होत आहे. 

पोलादपूर तालुक्‍यातील दिवील येथील भाऊ भिलारे, भारती दिलिप भिलारे, ओंकार दिलिप भिलारे हे सरपण गोळा करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर पिसाळलेल्या डुकराने हल्ला केला. जखमींना महाड ट्रामा केअर; तर एकाला मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महालगुर येथे विष्णू कदम यांच्या अंगणात त्याच दिवशी सकाळी बिबट्या आल्याने कुत्रे भुंकण्याचा आवाज आला असता त्यांच्या पत्नी शारदा कदम यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता त्यांना बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड केल्याने ग्रामस्थ धावून आले. त्यामुळे बिबट्याने तिथून धूम ठोकली. 

लॉकडाऊनमुळे वन्यजीव मोकळे होऊन फिरत आहेत. पोलादपूर तालुक्‍यातील डोंगरभागात मोठ्या प्रमानवर रानडुकर मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांची संख्या वाढत आहेत. आता ते मानवी वावर असलेल्या भागात येत आहेत. 
याबाबत पोलादपूर वनपरिमंडळ अधिकारी श्‍याम गुजर यांनी सांगितले की, दिवील येथील घटनेचा वन विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाईल. ग्रामस्थांनी जंगलामध्ये लाकूडफाटा गोळा करण्यासाठी जाऊ नये असे अहवान केले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : भुजबळांच्या समता परिषदेची बैठक संपली; केंद्र सरकारकडे 'ही' मागणी करण्याचा निर्णय

Sharad Pawar: माकप राज्यात १२ विधानसभा जागावर लढवणार निवडणूक? पावारांंसोबत झाली सकारात्मक चर्चा!

Viral Video: "इस्लाम हा एक न्याय्य धर्म, तो समाजावर लादला पाहिजे..." विद्यार्थ्याच्या खळबळजनक विधानामुळे सोशल मीडिया पेटले

X Overpayment Issue : इलॉन मस्कने कर्मचाऱ्यांचा पगार मागितला परत; कोट्यवधींच्या रक्कमेसाठी काढली नोटीस,जाणून घ्या काय आहे प्रकरण

Babar Azam: 'मी असतो तर त्वरित कॅप्टन्सी सोडली असती...', माजी कर्णधाराने बाबरवर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT