मुंबई

खासगी रुग्णालयाच्या बिलाची रक्कम जाहीर करा;वाचा कोणी केली 'ही' मागणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र सरकार हे खासगी रुग्णालयात होणारी लूट आणि आर्थिक शोषण यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. असे असताना दररोज लुटीच्या वेगवेगळया तक्रारी येतच आहेत. भलेह सर्व खासगी रुग्णालय माफक दर असल्याचे सांगत असले तरी छुप्या दरामुळे रुग्ण आणि कुटुंब हे असहाय्य होतात. म्हणून खाजगी रुग्णालयातील रिसेप्शन किंवा बाहेर बिलाची रक्कम जाहीर करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांसकडे केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव अजोय मेहता यांस लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की अश्या परिस्थितीत रुग्णालयातील रिसेप्शन किंवा बाहेर बिलाची रक्कम डिस्प्ले करणे आवश्यक आहे. यामुळे रुग्णालय व्यवस्थापन खोटी माहिती देणार नाही आणि सर्वसामान्यांना सत्यपरिस्थिती लक्षात येईल. आज मंत्री, अधिकारी रुग्णालयात अचानक जातात आणि कारणे दाखवा नोटीस देतात पण ऑन दी स्पॉट कार्यवाही होत नाही. यामुळे रुग्णालय व्यवस्थापनाची मुजोरी वाढत असल्याचेही गलगली म्हणाले.

रुग्णालयांकडून अनेक बाबींची पूर्तता नाही
सरकारने खासगी रुग्णालयांना आपले दरपत्रक दर्शनी भागात लावण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र याचीही पूर्तता अनेक रुग्णालये करत नाहीत. शिवाय रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्याकडून वेगळ्या पद्धतीने पैसे जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दर पत्रक जरी लावण्यात आले तरी प्रत्येक रुग्णाचे उपचाराचे जे बिल होईल त्याचा ही जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT