File Photo 
मुंबई

#CORONA : लष्कर तैनात करण्यासाठी कोर्टाला साकडे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशभरात लॉकडाऊन असतानाही अनेक ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने जमा होत असल्याचे आढळते. त्यामुळे जमावाला बंदी करण्यासाठी सर्व राज्यांत लष्कर तैनात करावे, अशा मागणीची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे आणि दिल्लीतील आनंद विहार येथील घटनांचा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे.

दिल्लीतील आनंद विहार बसस्थानकाबाहेर आणि मुंबईतील वांद्रे रेल्वेस्थानकाबाहेर परराज्यांतील मजुरांनी गावी जाण्यासाठी गर्दी केली होती. या घटनांचा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे. या घटना पूर्वनियोजित होत्या का, देश आणि राज्य सरकारला अस्थिर करण्यात प्रयत्न केला जात आहे का हे तपासायला हवे, असेही याचिकादाराने म्हटले आहे. सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शेणॉय यांनी ऍड्‌. ओमप्रकाश परिहार यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. 

सध्या संपूर्ण देश आणि सरकारी यंत्रणा कोरोनाशी लढा देत आहेत. त्यामुळे मुंबईतील वांद्रे आणि दिल्लीतील आनंद नगर येथे स्थलांतरित मजुरांनी केलेल्या गर्दीच्या घटना गांभीर्याने घ्यायला हव्यात, असे याचिकादाराने म्हटले आहे. कोरोना हॉट स्पॉटच्या ठिकाणी सशस्त्र दल तैनात करावे; अन्यथा समाजकंटक हल्ला करून धोका वाढवू शकतात, अशी भीती याचिकेत व्यक्त केली आहे. याचिकेवर या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. 

चौकशीची मागणी
कोविड-19 चा धोका वाढल्यामुळे केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जारी केला असून, राज्य सरकारने जमावबंदी केली आहे. तथापि, अनेक राज्यांमध्ये या आदेशांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. अशा प्रकरणांत सीबीआय किंवा एनआयए यांच्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी जनहित याचिकेत करण्यात आली आहे.

Deploy an army to prevent the mob

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT