मुंबई

विकासकांची मोठी मागणी, रेरा कायद्यातील कलम 12, 14, 18 आणि 19 सहा महिन्यांसाठी स्थगित करा...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनामुळे रिअल इस्टेटमध्ये पुन्हा मंदीचे सावट घोंगावट असताना स्थावर संपदा कायद्यातील (रेरा) कायद्यातील कलम 12, 14, 18 आणि 19 सहा महिन्यांसाठी स्थगित करावी अशी मागणी विकासकांनी केंद्र सरकारकडे केली आहे. मात्र या मागणीला विविध राज्यांतील रेरा प्राधिकरणांनी विरोध दर्शविला आहे.

रिअल इस्टेट क्षेत्र देशातील सर्वाधित रोजगार निर्माण करणाऱ्या क्षेत्रापैकी एक आहे. मागील काही वर्षांपासून रिअल इस्टेट क्षेत्र मंदीचा सामना करते आहे. त्यातच कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका बांधकाम व्यवसायाला बसला आहे. अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेत अडकले आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेले बांधकाम व्यावसायिक आणखी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारकडून रिअल इस्टेटला मोठा दिलासा आहे. 

कंत्राटदारांना त्यांचे काम पूर्ण करण्यासाठीच्या मर्यादेत सहा महिन्यांची वाढ करून देण्यात आली आहे. केंद्र सरकारने रेरा कायदा लागू केल्यानंतर  रेरा कायदा हा ग्राहकांच्या व बांधकाम व्यावसायिक असे दोघांच्याही हिताचा आहे. मात्र प्रकल्प नोंदणी बंधनकारक केल्यामुळे पूर्वीसारखी मनमानी करण्यावर निर्बंध आले. पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांची भाडी थकविली तरी त्यांच्यावर कारवाई होत होती. या पार्श्वभूमीवर रेरा कायद्यातील कलम 12, 14, 18 आणि 19 सहा महिन्यांसाठी स्थगित करण्यात यावीत, अशी मागणी विकासकांनी केली आहे.  महाराष्ट्र वगळता सहभागी झालेल्या विविध राज्यांतील रेरा अध्यक्षांनी तसे करता येणार नाही अशी चर्चा सुरु आहे. मात्र या रेरा कायद्यातील कलमे स्थगित करण्याचे प्रयत्न सुरू झाले असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.  

काय आहे या कलामांमधील तरतुदी :

  • (12) प्रकल्पाबाबतच्या जाहिरात वा माहितीपुस्तिकेत चुका असतील तर प्रवर्तकाची जबाबदारी
  • (14) मंजूर आराखडा वा प्रकल्पानुसारच आखणी, ग्राहकांची मंजुरीनेच बदल आवश्यक
  • (18) नियोजित वेळेनुसार घराचा ताबा देण्यास विलंब झाल्यास नुकसानभरपाई देणे
  • (19) घरखरेदीदारांचे अधिकार

developers demands suspension of article 14 15 18 and 19 under rera act for six moths

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Pune MLC Election: शिक्षक, पदवीधर’ची आजपासून रणधुमाळी ;दोन दिवसांत जागा वाटप; सहा ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT