Development Officers Office lock
Development Officers Office lock 
मुंबई

गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला ठोकले टाळे

मुरलीधर दळवी

मुरबाड (ठाणे) : मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस ई ए हाश्मी यांच्या कार्यालयाला सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी टाळे मारल्याच्या घटनेचे पडसाद विविध स्तरातून उमटायला सुरुवात झाली आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच कर्तव्य दक्ष व प्रशासनाला शिस्त लावणारे लाच न घेणारे गटविकास अधिकारी हाश्मी यांना पाठींबा व्यक्त केला जात आहे.

शुक्रवारी (ता 13) सत्ताधारी भाजपचे मुरबाड पंचायत समितीचे सभापती, उपसभापती व पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी लोकांची शौचालयाची, घरकुलांची बिले मंजूर करत नाहीत, असभ्य वर्तन करतात, अरेरावी करतात असा आरोप करीत गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयास टाळे ठोकले व त्यांची बदली होत नाही तोपर्यंत त्यांना काम करू दिले जाणार नाही असा इशारा दिला आहे.

मुरबाड तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनाला टाळे ठोकण्याच्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला असून सोमवारी (ता 16) मुरबाड पंचायत समितीच्या कार्यालयासमोर भाजप सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे. अशी माहीती अध्यक्ष कृष्णकांत तुपे यांनी दिली.

ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या समर्थकांनी कार्यक्षम गटविकास अधिकारी हाश्मी याना पाठींबा व्यक्त करून टाळे मारण्याच्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT