Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray 
मुंबई

Cyclone Tauktae: "आता तरी सरकारने मदत करावी"

वर्षभरापूर्वी झालेल्या नुकसानीची मदत अद्यापही मिळालेली नसल्याचा काही रायगडवासीयांचा आरोप

विराज भागवत

वर्षभरापूर्वी झालेल्या नुकसानीची मदत अद्यापही मिळालेली नसल्याचा काही रायगडवासीयांचा आरोप

"रायगड जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. आज आम्ही रायगड जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा जिल्ह्याधिकाऱ्यांकडून घेतला. जिल्ह्यातील सुमारे ८ ते १० हजार घराचं नुकसान झाल्याचं चित्र आहे. २०० शाळांचंही नुकसान झालं आहे. याशिवाय, वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या २५ मेडिकल इमारतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वादळामुळे काही ठिकाणी विजेचे खांब कोसळून बरंच नुकसान झालंय. १७२ गावांमध्ये अद्यापही वीज सुरू झाली नाही. त्यामुळे नुकसानीचा सरकारने लवकरात लवकर पंचनामा करून मदतीसाठी भरघोस पॅकेज जाहीर करावं", अशी मागणी राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. (Devendra Fadnavis demands Thackeray Govt to give Relief Fund money for cyclone hit areas as early as possible)

"जिल्ह्याधिकाऱ्यांशी आज आम्ही चर्चा केली. त्यावेळी त्यांनी आम्हाला विविध गोष्टींची माहिती दिली. जिल्ह्यात जर अशा प्रकारची परिस्थिती आली तर काय पद्धतीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत आणि त्यातील काय उपाय केले होते याबद्दलची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. रायगडात प्रचंड मोठे नुकसान झाले. रायगडमध्ये असलेल्या कोळी समाजाच्या बोटी वादळामुळे मोडल्या. घरांचे पत्रे उडाले. या सर्व वादळग्रस्तांशी आम्ही चर्चा केली. त्यावेळी असं समजलं की गेल्या वर्षीचीच मदत मिळालेली नाही. गेल्या वर्षी झालेल्या निसर्ग वादळातील नुकसान भरपाईदेखील आम्हाला अद्याप मिळालेली नाही, असे काहींनी सांगितलं", असं ते म्हणाले.

"माझी राज्य सरकारला विनंती आहे की आता यंदा झालेल्या नुकसानीचा वेळेत पंचनामा करा. गेल्या वेळी अनेकांना मदतीपासून वंचित राहावं लागल्याचं चित्र आहे. त्यामुळे यंदा तरी किमान सरकारने वेळेत बाधितांना मदत करावी", अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT