Devendra Fadnavis sakal media
मुंबई

शिवसेनेची ताकद कमी होतेय; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : राज्यात जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकांमध्ये (jilha parishad election) भारतीय जनता पक्षाला (BJP) सर्वाधिक जागा मिळाली असून सत्ताधारी शिवसेना मात्र चौथ्या क्रमांकावर राहिली आहे. त्यामुळे राज्यात सेनेची (shivsena) ताकद कमी झाली आहे, हे या निकालांवरून (election results) स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तन येथे व्यक्त केले.

उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे उभारण्यात आलेल्या पं. दीनदयाळ दर्शन प्रकल्पाचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ अधिकारी भय्याजी जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपस्थित असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हे मत व्यक्त केले. या निवडणुकीत मतदारांनी भाजपवर सर्वांत जास्त विश्वास दाखवल्यामुळे भाजपने एकूण जागांच्या २५ टक्के जागा जिंकल्या आहेत.

२५ टक्के जागा अपक्ष आणि इतरांना मिळाल्या आहेत; तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे उरलेल्या ५० टक्क्यांमध्ये राहिले आहेत. यावरून भाजपने राज्यात स्वत:ची व्याप्ती वाढवली आहे आणि ती वाढवतच जाणार आहे; तर शिवसेनेची जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी कमी करत आहे आणि याचा विचार त्यांनी करायचा आहे, असे फडणवीस म्हणाले.

लखीमपूर घटनेवर राजकारण

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील घटनेबद्दल राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत खेद व्यक्त केला. यासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, की लखीमपूर घटनेवर खेद व्यक्त करत असतानाच राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाकडे अधिक लक्ष दिले असते. अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे जो शेतकरी आक्रोश करत आहे, त्याचा विचार केला असता तर हे सरकार शेतकऱ्यांचे कैवारी आहे असे म्हणता आले असते, परंतु त्यासंदर्भात कोणताही ठोस विचार न करता अशा प्रकारचा प्रस्ताव संमत करणे म्हणजे केवळ संधीसाधूपणा आहे आणि यात राजकीय वास येतो. शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी मदत मिळाली नाही तर भारतीय जनता पक्ष आंदोलन करेल, असा इशारा फडणवीस यांनी या वेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Vanchit Alliance : काँग्रेस अन् 'वंचित बहुजन'चं ठरलं ! मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढणार; युतीची अधिकृत घोषणा

Solapur Politics: काँग्रेसची २० जणांची पहिली यादी जाहीर; पाहा उमेदवारांची नावे

Thane News: अंबरनाथच्या रस्त्यांवर पडला ‘नोटांचा पाऊस’, बनावट नोटांमुळे चालकांचा संभ्रम

Instagram New Features : 2025 वर्षांत लाँच झाले इंस्टाग्रामचे 10 जबरदस्त फीचर्स; पण अजूनही 90 टक्के लोकांना माहितच नाही

Latest Marathi News Live Update : तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला घटस्थापनेने विधिवत प्रारंभ

SCROLL FOR NEXT