मुंबई

"ही प्रथा योग्य नाही"; देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत

मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात दिल्लीत प्रदीर्घ चर्चा

विराज भागवत
  • मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात दिल्लीत प्रदीर्घ चर्चा

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील विविध प्रश्नांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीला भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण हेदेखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांमध्ये सुरूवातीला सुमारे ३० मिनिटं वैयक्तिक चर्चा झाली. त्यानंतर अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यासमवेत ठाकरे यांनी मोदींशी विस्तृत चर्चा केली. चर्चेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संबंधीची माहिती दिली. या भेटीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. (Devendra Fadnavis Reaction on PM Modi CM Uddhav Thackeray 2 hour long meeting in Delhi)

"महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले ही खूपच चांगली गोष्ट झाली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांची भेट घ्यायला हवीच होती. आम्ही नेहमीच सांगत होतो की अशा प्रकारचे प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना नेहमी भेटलं पाहिजे. कारण अशानेच राज्याचं भलं होतं. पंतप्रधान हे नेहमीच महाराष्ट्राबद्दल सकारात्मक असतात. ते वेळोवळी दिसून आलंय. राज्य आणि केंद्र यांच्यातील संबंध चांगले ठेवले तर त्याचा राज्यालाच फायदा होतो. अशा वेळी काहीही झालं तर उठसूट केंद्राकडे बोटं दाखवयाची ही प्रथा योग्य नाही. ते जाऊन भेटले ही खूप चांगली गोष्ट घडली", अशा शब्दांत फडणवीस यांनी या भेटीवर आपली प्रतिक्रिया दिली.

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांशी वैयक्तिक भेट झाली की नाही याबद्दल मला काहीही कल्पना नाही. पण तशी भेट जर ठाकरे यांची पंतप्रधानांशी झाली असेल तर त्यात आश्चर्य वाटून घेण्यासारखं काहीच नाही. कारण पंतप्रधान मोदी यांच्याशी मी मुख्यमंत्री असताना जेव्हा भेटायला जायचो तेव्हादेखील ते शिष्टमंडळाशी काही वेळ चर्चा करायचे आणि त्यानंतर काही वेळ मुख्यमंत्री म्हणून माझ्याशी वैयक्तिक चर्चा करायचे. त्यामुळे अशी व्यक्तिगत भेट झाली असेल तर त्यात काही आश्चर्यकारक नाही", असं उत्तर फडणवीस यांनी दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT