मुंबई

"माझं ऐकलं असतं तर फडणवीस मुख्यमंत्री झाले असते"

"माझं ऐकलं असतं तर फडणवीस मुख्यमंत्री झाले असते" सध्या राज्याच्या राजकारणात रोज नवनवीन गोष्टी उघड होत आहेत Devendra Fadnavis Shivsena BJP CM Post Clash Central Minister Ramdas Athawale Advice Uddhav Thackeray

सुमित बागुल

सध्या राज्याच्या राजकारणात रोज नवनवीन गोष्टी उघड होत आहेत

मुंबई: विधानसभेची २०१९ मध्ये निवडणूक (Elections) झाली आणि राज्यातील शिवसेना-भाजप युती तुटली. शिवसेनेला (Shivsena) हवे असलेले अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद (Cm Post) भाजपने (BJP) न दिल्याने दोन पक्षांचे मार्ग वेगळे झाले. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) या दोन पक्षांसोबत जावून महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) स्थापना केली आणि उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) स्वत: मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. या साऱ्या घटना महाराष्ट्रातील प्रत्येकाला चांगल्याच लक्षात आहेत. या दरम्यान, शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री मान्य करा असा एक सल्ला देण्यात आला होता. केंद्रातील एका मंत्र्याने देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) हा सल्ला दिला होता, पण त्यांनी तो ऐकला नाही आणि म्हणूनच आता फडणवीसांना विरोधी पक्षनेते राहावं लागतंय, असा खुलासा त्या केंद्रीय मंत्र्याने केला. (Devendra Fadnavis Shivsena BJP CM Post Clash Central Minister Ramdas Athawale Advice Uddhav Thackeray)

"राज्यातील सरकार पडणार अशी ओरड रोज ऐकायला मिळते. पण जेव्हा भाजप आणि शिवसेना यांच्यात फूट पडताना मला दिसली होती, तेव्हाच मी ही युती तुटू नये म्हणून प्रयत्न करत होतो. शिवसेना अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदावर अडून बसली होती. त्यामुळे तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी माझं ऐकलं असतं, तर बरं झालं असतं. ते मुख्यमंत्री बनले असते. मी त्यांना सांगत होतो की शिवसेनेसोबत अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद मान्य करा. अडीच वर्षांसाठी तुम्हाला व्हायचं नसेल, तर मला मुख्यमंत्री करा. इतकं समजवूनही माझं कोणी ऐकलं नाही. त्यामुळे आता 5 वर्ष विरोधी नेते राहण्याची वेळ आलेली आहे", असा खुलासा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. मुंबईत पत्रकारांशी त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. तेव्हा त्यांनी विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केलं.

Ramdas-Athawale

राजेश टोपे यांचा कवितेतून कौतुक

"मी कोविड पेशंट होतो. कोरोनाने साऱ्या जगाला नाचवले पण डॉक्टरांनी लाखो लोकांना वाचवले. पेशंटला हॉस्पिटलमध्ये जाताना मला माझे हॉस्पिटलचे दिवस आठवतात. मी सुद्धा गो-कोरोनाचा नारा लगावला होता. त्यामुळे बॉम्ब हॉस्पिटलमध्ये असताना मला वाटलं की मीच गो होतोय की काय? पण एक मात्र नक्की की आपले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परिस्थिती चांगल्या प्रकारे सांभाळली", असं ते म्हणाले. तसेच,

आरोग्य खाते कोरोनाच्या काळात चालवणं नसतं सोपे

तरी व्यवस्थित हे खातं सांभाळणारे आहेत राजेश टोपे

अशी छोटीशी कविता करून त्यांनी टोपे यांच्या कामाचे कौतुक केले.

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT