Dhananjay Munde sakal
मुंबई

नशाबंदी प्रबोधनाच्या अनुदानात 30 लाखावरून 60 लाख रुपयांची वाढ - मुंढे

नशाबंदी मंडळ ही शासनाच्या व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनामार्फत कार्यरत असलेली एकमेव अनुदानित संस्था आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नशाबंदी मंडळ ही शासनाच्या व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनामार्फत कार्यरत असलेली एकमेव अनुदानित संस्था आहे. राज्यातील भावी पिढी व्यसनाधीन होऊ नये यासाठी पूर्णवेळ कार्यरत असलेल्या या मंडळाचे2018 पासूनचे 54 लाख 15 हजार अनुदान तात्काळ अदा करण्यात यावे, असे आदेश आज निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. (Mumbai News)

याचबरोबर काळाची गरज ओळखुन नशाबंदी संदर्भात मोठ्या प्रमाणात तरूणांचे प्रबोधन अत्यावश्यक असून त्याद्वारे महाराष्ट्राची प्रगती साध्य करता येणार आहे. नशाबंदी मंडळाचे काम आणि राज्याची व्याप्ती पाहता दरवर्षी वितरीत होणा-या अनुदानात वाढ करून ती 30 लाखावरून 60 लाख इतकी करण्याच्या कार्यवाहीस गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मंत्रालयात नशाबंदी मंडळ या संस्थेच्या अनुदान व कामकाजा संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, सामाजिक न्याय विभागाचे सह सचिव दि.रा. डिंगळे आदिसह नशाबंदी मंडळाचे अध्यक्ष माजी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ राजेंद्र वेळुकर, कार्याध्यक्ष आयुक्त आर.के. गायकवाड, सरचिटणीस वर्षा विद्या विलास, कार्यकारिणी सदस्य प्रिया पाटील, डॉ. प्रभा तिरमारे, प्रिया पाटील हे उपस्थित होते.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, नशाबंदी हा संवेदनशील विषय असून, याबाबत तरुणांमध्ये जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे. 2020-21 या आर्थिक वर्षातील एकूण देय अनुदानापैकी 14.85हजार इतके अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अंमली पदार्थ विरोधी मोहिम आणि व्यसनाधिन व्यक्तींचे पुनर्वसन करण्यासाठी स्वयंसेवी संघटनांना तीन कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.

व्यसनमुक्ती धोरणाअंतर्गत प्रत्येक महसुली विभागास दोन याप्रमाणे व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये कार्य करणा-या 12 संस्थांना प्रत्येकी 11 लाख अशी एकुण एक कोटी 32 लाख याचबरोबर राष्ट्रीय महात्मा गांधी पुरस्कार व सातवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तीन कोटी रक्कम वितरीत करण्यात येत असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT