Dhanajay Munde Meets Devendra Fadnavis Sakal
मुंबई

धनंजय मुंडे रात्री सागर बंगल्यावर; फडणवीसांची घेतली भेट

शांत होऊ पाहणारं राजकारण पुन्हा तापणार का? आता कोणतं नवं वळण येणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राज्यातलं राजकारण आत्ता कुठे शांत होत असल्याची चिन्हं दिसत आहेत. पण आता पुन्हा एकदा राजकारणाच्या गोटात खळबळ माजणार का, अशा चर्चा सुरू होऊ लागल्या आहेत. याचं कारण म्हणजे धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची रात्री उशिरा झालेली भेट. (Dhanajay Munde Meets Devendra Fadnavis)

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी काल रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर ही भेट पार पडली. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. ही कोणत्या नव्या राजकीय अंकाची नांदी आहे, असाही प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहिला आहे. मात्र धनंजय मुंडेंनी या शक्यता फेटाळल्या आहेत. उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल आपण फडणवीसांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

तसंच एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सध्या गोव्यात आहेत. मात्र ते जेव्हा मुंबईत परत येतील, तेव्हा त्यांची भेट घेऊन आपण त्यांचंही अभिनंदन करणार असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं. मात्र सध्या राज्यात होणाऱ्या नाट्यमय घडामोडी पाहता (Maharashtra Politics) रात्री उशिरा झालेल्या या भेटीमुळे नव्या सत्तानाट्याचे संकेत मिळत आहेत. आता या दोघांच्या भेटीबद्दल अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. 2019 साली अजित पवार - देवेंद्र फडणवीस यांचं पहाटेचं सरकार आलं होतं, त्याआधीच्या रात्री उशिरा ते कुठेतरी बाहेर गेले होते. आत्ताही तसंच घडत असल्यानं राजकीय विश्लेषकांनी शंका व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT