Kshitij Prasad 
मुंबई

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाचं करण जोहर कनेक्शन? धर्मा प्रोडक्शनच्या एकास अटक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास आत्महत्या की हत्या यावरून सुरु झाला होता. मात्र आता या तपासाला फाटे फुटले असून ड्रग्ज कनेक्शनचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. या ड्रग्ज कनेक्शन तपासाचा व्याप देखील दिवसेंदिवस वाढतच चालला असून संपूर्ण बॉलिवूडच या प्रकरणाने धास्तावलेलं आहे. नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरो म्हणजेच एनसीबीने या ड्रग्ज प्रकरणी शनिवारी आणखी एकाला अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार धर्मा प्रोडक्शनच्या क्षितिज प्रसादला या प्रकरणी अटक झालेली आहे. रिया चक्रवर्ती आणि तीचा भाऊ अटकेत आहेच. त्यानंतर, या प्रकरणात रकूलप्रीत सिंह, श्रद्धा कपूर, साराह अली खान यांचेही नावे आलेली होते. आजच एनसीबीकडून दीपिका  पादूकोण आणि श्रद्धा कपूरचीही चौकशी करण्यात आली आहे.

काल शुक्रवारी एनसीबीने क्षितिज प्रसादसोबत रात्री उशिरापर्यंत चौकशी केली होती. इतकंच नव्हे तर त्याच्या घराची तपासणीही केली होती. असं म्हटलं जात आहे की, धर्मा प्रोडक्शनच्या क्षितिजचे नाव हे अटकेत असणाऱ्या ड्रग्ज पॅडलर अंकूश अरनेजाकडून आलं आहे. क्षितिज हा करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनशी निगडीत असल्याचं एनसीबीने म्हटलं असलं तरीही करण जोहर यांनी आपण क्षितीजला ओळखत नसल्याचं म्हटलं आहे. 

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर करण जोहरने आयोजित केलेल्या एका पार्टीचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला होता. यात ड्रग्जचा वापर झाला होता अशी चर्चाही झाली होती. या चर्चेला पुर्णविराम देत करण जोहरने आपल्या ऑफिशियल स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, 2019 मध्ये त्याच्या घरी झालेल्या पार्टीत कसल्याही ड्रग्जचा वापर केला गेला नव्हता. या पार्टीत दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, शाहिद कपूर, वरुण धवन, मलायका अरोरा, अर्जून कपूर आणि इतरही काही सेलिब्रिटी सामील होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jintur Accident : आईसोबत गजानन महाराजांच्या आरतीला गेलेल्या ७ वर्षीय निष्पाप चिमुकल्याचा अज्ञात क्रूझर वाहनाने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिल्या सामन्यावर संकट! दिल्ली पोलिसांचे पत्र अन् उडाली खळबळ; नेमकं काय घडलं?

Video: गार्गीला वाचवण्यासाठी गौतमी पाटीलची साद; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली, 'तिला मदत करा'

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Pakistan Cricket : पाकिस्तानचे दोन सीनियर खेळाडू निघाले 'गद्दार'? सायबर क्राईमने पाठवले समन्स, लॉर्ड्स कसोटीत Fixing ची शंका

SCROLL FOR NEXT