मुंबई

हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आज आढळले 'इतके' रुग्ण, वाचा सविस्तर

मिलिंद तांबे

मुंबई: कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अशातच मुंबई शहराला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. एकेकाळी मुंबईत वरळी आणि धारावी हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र आता मुंबईत कोरोना नियंत्रणात येताना दिसत असतानाच धारावीतही कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत चालला आहे. धारावीत आज दिवसभरात ४ रुग्ण आढळून आलेत. 

धारावीत आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २६७२ इतकी आहे.  तर केवळ ८० अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दादरमध्ये  २९ रुग्ण तर माहिममध्ये १९ नवे रुग्ण सापडलेत. त्यामुळे जी उत्तरमध्ये ५२ रुग्णांची भर पडली आहे.

दादरमध्ये आज २९ नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही २२३७ इतकी झाली आहे. ४६५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्ये आज १९ नवीन रुग्णांची भर पडल्यानं रुग्णांची संख्या २०१२ इतकी झाली. तर २५६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. संपूर्ण जी उत्तरमध्ये एकूण ८०१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

जी उत्तर विभागातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ५२ रुग्णांची भर पडली असून जी उत्तर विभागातील रुग्णसंख्या ही ६,९२१ वर पोहोचली आहे. धारावीत २३३३, दादरमध्ये १६८४  तर माहीममध्ये १६७९ असे एकूण ५६९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

(संपादनः पूजा विचारे)

Dharavi slum just four new COVID-19 cases total count to 2,672

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT