file 
मुंबई

'हे' खा आणि आयुष्यभर फिट राहा 

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : अनेक जण सध्या धावपळीज जीवन जगत असतात. यातून शरीराकडे पुरेसे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. तसेच व्यायाम करण्यासही वेळ मिळत नसल्याने आपल्याला थकवा जाणवत राहतो. परिणामी त्याचा परिणाम दैनंदिन कामावर तसेच शरीरावरही होतो. त्यामुळे शरीरासाठी योग्य आणि पोषक आहार कसा मिळेल याकडे सतत लक्ष देणे आवश्‍यक ठरते. 

शरीरातील स्नायूंच्या पोषणासाठी व हाडांच्या मजबुतीसाठी आहारात प्रथिनयुक्त पदार्थाचा समावेश आवश्‍यक आहे. 
मटण, चिकन, मासे, अंडी, दूध, चीज, पनीर हे पदार्थ प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. त्यामुळे न्याहारीच्या वेळी अंडे आणि दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. या पदार्थामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने यातून मिळणारा उष्मांक दिवसभर पुरतो आणि पोट भरल्याची जाणीव होते. फक्त शाकाहारी असणाऱ्यांना दुधाव्यतिरिक्त कडधान्ये, सर्व प्रकारच्या डाळी यातून काही प्रमाणात प्रथिने मिळतात. मासे, चिकन याप्रमाणे हे प्रथिनांचे उत्तम स्रोत नाहीत. मात्र शाकाहारी आहारात सोयाबीन हा प्रथिनांचा उत्तम स्रोतांना पर्याय आहे, असे मुंबईतील द क्‍लब मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या राइट टू प्रोटीन या चर्चासत्रात सांगण्यात आले. 


बहुसंख्य भारतीयांमध्ये, आहारात प्रथिनांचा समावेश करण्याविषयी उदासीनता आढळून येते आणि त्यादृष्टीने समाजजागृतीची आवश्‍यकता आहे. हे उद्दीष्ट ठेवून, भारतीयांच्या दैनंदिन आहारात प्रथिनांचे महत्त्व आणि भूमिका यावर उपस्थितांना माहितीपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी या आरोग्य चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. 
सर्वोत्तम दर्जाची प्रथिने, भारतीयांमध्ये प्रथिनांची गरज (बालक आणि ज्येष्ठ नागरिक) तसेच, विविध खेळ आणि शरीर सौष्ठव व्यायामांमध्ये प्रथिनांची गरज या विषयांवर चर्चासत्रात सविस्तर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर देशभरातून आलेल्या तज्ज्ञांची विशेष उपस्थिती होती आणि त्यांनी देशात प्रथिनांची गरज आणि लाभ या विषयावर सविस्तर चर्चा केली. 


या चर्चासत्राला आरोग्य क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ प्रामुख्याने उपस्थित होते. त्यात, पोषणाहारतज्ज्ञ, प्रख्यात शेफ, खाद्यान्न पदार्थांचे संशोधक आणि जीवशास्त्रज्ञ, आरोग्य आणि फिटनेस तज्ज्ञांचा विशेषत्वाने सहभाग होता. या चर्चासत्राला विशेष पाहुण्या म्हणून रामनारायण रूईया महाविद्यालयाच्या (सुपरऍनॉटेड) सहायक प्राध्यापिका आणि विभागप्रमुख डॉ. ज्योती दीपक व्होरा उपस्थित होत्या. सावर्डे व्हॅली फूड फाऊंडेशनचे संचालक निलेश लेले, डॉ. बी. एम. नानावटी गृह शास्त्र महाविद्यालयाच्या अन्नविज्ञान आणि पोषण विषयाच्या सहायक प्राध्यापिका डॉ. मीना मेहता, सेंटर फॉर सोशल ऍण्ड बिहेव्हियर चेंज कम्युनिकेशन संस्थेच्या संस्थापक संचालिका प्रिया सबनीस-अत्रे, भारतीय अन्न शास्त्रज्ञ आणि संशोधक संघटनेच्या सचिव चिन्मयी देऊळगावकर या तज्ज्ञांनी आपल्या वैचारीक आणि महत्त्वपूर्ण भाषणांमधून, आपल्या देशात प्रथिनांचे महत्त्व व्यवस्थित समजून घेण्याची गरज प्रतिपादीत केली. 

आरोग्याबाबत जागरूक राहा 
भारतीयांमध्ये दैनंदिन आरोग्य, फिटनेस आणि निरोगी राहण्यासाठी जागरुकता आणण्यासाठी हा उपक्रम प्रयत्नरत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश, भारतीय नागरिकांमध्ये आणि समाजगटांमध्ये जागृती निर्माण करण्याचा असून, प्रथिनांची पूरकता याविषयी अधिक माहिती देण्यात येते आहे. या माध्यमातून भारतीयांना प्रथिनांविषयी अधिकाधिक संवेदनशील विचार करण्यास प्रवृत्त करून, सार्वजनिक आरोग्य अधिक सुदृढ करण्याचे उद्दीष्ट आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Reservation : बंजारा समाजाला एस.टी.प्रवर्गातून आरक्षणासाठी अन्नत्याग उपोषण; भिलदरीत तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्याची तब्येत खालावली

Cancer Prevention Tips: कॅन्सरपासून वाचण्यासाठी रोजच्या दिनचर्येत समाविष्ट करा हे ८ सोपे उपाय!

Latest Marathi News Updates Live : गरियाबंदमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू

IND vs UAE : कुलदीप यादव नव्हे, तर 'हा' खेळाडू ठरला इम्पॅक्ट प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्काराचा मानकरी; ड्रेसिंग रूममधील Video

Pune Crime : अपघाताचा बनाव रचून मोबाईल लुटणाऱ्या टोळीला सहकारनगर पोलिसांनी पकडले

SCROLL FOR NEXT