Diwali Faral esakal
मुंबई

Diwali Faral: दिवाळीच्या फराळाला महागाईची फोडणी; किमती वाढल्याने नागरिक त्रस्त !

सकाळ डिजिटल टीम

Diwali Faral: दिवाळी जवळ आली असल्याने आठवडाभर आधीच फराळाचे पदार्थ तयार करण्याकडे गृहिणींचा कल आहे. अशातच केंद्र सरकारने आयात शुल्कात मोठी कपात केल्यामुळे सोयाबीन तेलाच्या किमती वधारल्या आहेत. त्यामुळे दिवाळीत फराळासाठी एकीकडे सोयाबीन तेलाची प्रचंड मागणी असताना दुसरीकडे सोयाबीन तेल महागल्याने सणाच्या उत्साहावर पाणी फेरले आहे.

सोयाबीन पिकाला यंदा पावसामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने त्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे सोयाबीनपासून तयार होणारी उत्पादने महागली आहेत. अशातच सध्या तेलाची मागणी वाढल्याने सोयाबीनसह पामतेलाची आयात करावी लागत आहे.

पंधरा दिवसांपूर्वी सोयाबीन तेल दर तब्बल सात ते दहा रुपयांनी (प्रतिकिलो) कमी होते. आठ दिवसांपूर्वी १५ किलोच्या डब्यासाठी १,५०० रुपये मोजावे लागत असताना आता तोच डबा १,६५० रुपयांवर गेला आहे. त्यामुळे सोयाबीन तेलासाठी प्रतिकिलो १२२ ते १३२ रुपये अधिक मोजावे लागत असल्याने दिवाळी फराळाच्या किमतींवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उत्पादन घटल्याचा परिणाम

दिवाळीत तेलाचा विविध पदार्थांसाठी अधिक वापर होतो. खाद्यतेलांमध्ये सोयाबीनशिवाय, शेंगदाणा, सूर्यफूल, राईस ब्रँड आदी विविध कंपन्यांचे तेल बाजारात आहे; मात्र या तेलांचे भाव स्थिरावलेले आहेत. सप्टेंबरअखेरीस सोयाबीनची स्थिती चांगली होती. त्यामुळे या तेलाच्या किमतीही ११५ ते १२२ रुपये किलोवर स्थिर होत्या; मात्र आता उत्पादन घटल्यामुळे ग्राहकांना महागाईचे चटके बसत आहेत.

दसऱ्यानंतर आता दिवाळीच्या तोंडावर तेलाची मागणी वाढलेली आहे. दुष्काळामुळे तेलबिया व सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे पामतेलासह सोयाबीन तेलाची आयात करावी लागत असल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम किमतींवर झाला आहे.

- शेखर सूर्यवंशी, व्यापारी, कळंबोली

मुलांना सुट्ट्या लागल्या की आम्ही फराळ करायला घेतो. दिवाळीच्या फराळात तळण्याच्या पदार्थांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तेल मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तेलाच्या किमती वाढल्याची झळ यंदा दिवाळीच्या फराळाला बसणार आहे.

- मनीषा कदम, गृहिणी, पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ashok Saraf : कार्यक्रम अशोक सराफ यांच्या पुरस्काराचा, चर्चा मुश्रीफ, बंटी पाटील, उदय सामंत यांच्या राजकीय टोलेबाजीची, मामाही म्हणाले...

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

प्रेमसंबंधाचा संशय! लेकीला हात बांधून कालव्यात ढकललं, बापाने व्हिडीओसुद्धा शूट केला; आई अन् लहान भाऊ बघत राहिले

Hot Chocolate For Periods: पीरियड्समध्ये हॉट चॉकलेट का प्यावं? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Mumbai News: मुंबईकरांचा त्रास कमी होणार! पाऊस थांबताच काँक्रीटीकरणाला सुरुवात; पालिकेची खड्डेमुक्त शहराकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT