मुंबई

'स्प्रे सॅनिटायझर' वापरताय?...मग सावध राहा....'हा' आहे धोका!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी तुम्ही जर 'स्प्रे सॅनिटायझर'चा वापर करत असाल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कारण या सॅनिटायझरमध्ये ज्वलनशीर पदार्थ असल्याने ते तुमच्यासाठी धोकाडायक आणि जीवघेणे ठरू शकते. अश्या स्प्रे सॅनिटायझरवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या सॅनिटायझरचा वापर केला जातोय. सर्वच प्रकारच्या सॅनिटायझरला मोठी मागणी आहे.बाजारात इतर सॅनिटायझरसह आता 'स्प्रे सॅनिटायझर' ही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले असून त्याला मोठी मागणी आहे. बऱ्याच सॅनिटायझर मध्ये 'इथाईल अल्कोहोल'चा वापर केला असतो. 'इथाईल अल्कोहोल' हा ज्वलनशील पदार्थ आहे. त्यामुळे याचा वापर धोकादायक आणि जीवघेणा ठरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोना संसर्गापासून काळजी घेण्यासाठी 'सॅनिटायझर' वापरण्यास सांगण्यात आले आहे. वाढत्या मागणीमुळे सॅनिटायझर खप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मुंबईत दिवसाला 5 लाखाहून अधिक लोक सॅनिटायझरची मागणी करत आहेत.  हात स्वच्छ करण्यासोबतच वस्तू स्वच्छ करण्यासाठी देखील सॅनिटायझरचा वापर करण्यात येतोय. यासाठी 'स्प्रे सॅनिटायझर'ची मागणी वाढली आहे. 'स्प्रे सॅनिटायझर'च्या धोक्याविषयी मात्र लोकं अनभिज्ञ आहेत.

ऑल फूड ऍण्ड ड्रग्स लायसेन्स होल्डर फाउंडेशनने 'स्प्रे सॅनिटायझर'च्या विक्रीला विरोध केला आहे. 'स्प्रे सॅनिटायझर'मध्ये 'इथाईल अल्कोहोल' हा ज्वलनशील पदार्थ असल्याने घरगुती वापरासाठी ते धोकादायक ठरू शकते. या धोक्याबाबत किंवा त्याच्या वापराबाबत ग्राहकांना पुरेशी माहिती नाही. त्यामुळे 'स्प्रे सॅनिटाईजर' वापरतांना अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सॅनिटायझरवर बंदी घालण्याची मागणी ऑल फूड ऍण्ड ड्रग्स लायसेन्स होल्डर फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी अन्न व औषध प्रशासन तसेच केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला ही पात्राद्वारे कळवले आहे. तोपर्यंत 'स्प्रे सॅनिटायझर' काळजीपूर्वक हाताळून खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT