BJP workers sakal
मुंबई

Dombivali Crime : भाजप कार्यकर्त्यांना शिवसेना पदाधिकाऱ्यांची मारहाण

भाजप शिवसेना स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील वाद काही केल्या मिटत नाही. कल्याण जवळील वडवली गावामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - भाजप शिवसेना स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील वाद काही केल्या मिटत नाही. कल्याण जवळील वडवली गावामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेले नाही.

यामुळे नाराज झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत पोलीस प्रशासन भाजप कार्यकर्त्यांबद्दल दुजाभाव करत असल्याचे व्यथा मांडली. आमच्यावर कायमच अन्याय होत असल्याचे देखील या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. यामुळे भाजपमधील वरिष्ठ आता काय निर्णय घेतात हे पहावे लागेल.

कल्याण जवळील वडवली गावातील तळ्याजवळ रस्त्याच्या वहिवाटीवरून वादाला तोंड फुटले आणि रविवारी संध्याकाळी तेथील ग्रामस्थांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली. शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा उपशहरप्रमुख दुर्योधन पाटील, वैभव पाटील आणि पंकज पाटील यांनी भाजप कार्यकर्ता मनोहर पाटील आणि त्याचा मित्र कमलाकर पाटील या दोघांना पिस्तोल काढुन शिवीगाळ आणि दमदाटी करत मारहाण केली आहे.

रविवारी सायंकाळी 4:30 सुमारास कल्याण जवळील वडवली गावात मनोहर पाटील आणि त्याचा मित्र कामाची पहाणी करत होते.यावेळी वडवली गावातील दुर्योधन पाटील आणि त्याची मुले वैभव पाटील, पंकज पाटील सदर ठिकाणी आले. त्या तिघांनी मनोहर आणि मित्र कमलाकर पाटील यांना शिवीगाळी केली आणि म्हणाले की 'तुम्ही आमच्या गावात काम कसे करता? तुंम्हाला कोणी काम दिले' असे म्हणुन 'तुम्ही या ठिकाणी कसे काम करता' 'तुंम्हाला मी दाखवतो' असे बोलुन त्याने पिस्तोल काढुन दमदाटी केली.

यावेळी मनोहर याने सांगितले की सदरचे काम हे फक्त रस्त्यापुरतेच आहे. आम्ही कोणतेही काम घेतलेले नाही असे सांगत असतांना कमलाकर पाटील देखील त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र वैभव व पंकज यांनी कमलाकर पाटील यास ठोष्याबुक्यांनी मारहाण केली आणि 'तुम्ही कसे काम करता ते आंम्ही बघतो' अशी दमदाटीही केली. तसेच वैभव पाटील याने त्याच्याकडील तलवार काढुन मनोहरच्या डोक्यात मारली.

त्यामुळे डोक्यात जखम होवुन रक्तस्त्राव होवु लागला. त्याचवेळी दुर्योधन पाटील याने त्याचे जवळील पिस्तलने माझे उजवे कानावर उपट मारली त्यामुळे माझे कानास दुखापत झाली आहे. तसेच त्यावेळी पंकजने देखील मारहाण केली. दरम्यान याप्रकरणी खडकपाडा पोलिस स्थानकात दुर्योधन पाटील, वैभव पाटील आणि पंकज पाटील यांच्यावर खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मात्र आरोपी अद्याप मोकाट असल्याने आणि त्यांना अटक केली जात नसल्याने कल्याण मधील भाजपच्या नेतेमंडळी आणि पदाधिकारी यांनी उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली आहे. भाजप कार्यकत्यांबाबत पोलिसांकडून दूजाभाव केला जात असल्याचे गाऱ्हाणे भाजपच्या कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास शासनाचे प्रोत्साहन

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT