Dombivli MIDC Blast esakal
मुंबई

Dombivli MIDC Blast : सात दिवस उलटूनही जोंधळेंचा मृतदेह सापडला नसल्याने पत्नी हवालदिल; प्रशासनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर

अमुदान कंपनीत स्फोट (Dombivli MIDC Blast) होऊन झालेल्या दुर्घटनेस सात दिवस उलटले आहेत.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली एमआयडीसीत अमुदान कंपनीत (Amudan Company Blast) झालेल्या स्फोटाच्या दुर्घटनेत अनेक कामगार मृत्युमुखी पडून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीत स्फोट (Dombivli MIDC Blast) होऊन झालेल्या दुर्घटनेस सात दिवस उलटले आहेत. मात्र, अजूनही मनीषा जोंधळे (Manisha Jondhale) यांचे पती अद्यापही सापडलेले नाहीत. मनोज हे या कंपनीत वॉचमन म्हणून काम करीत होते. प्रशासन मनीषा यांना कोणतीही मदत करत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सातत्याने आवाज उठविल्यानंतर प्रशासनाने अखेर पुन्हा एकदा अग्निशमन दलास (Fire Brigade) पाचारण करत मनोज यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून येत आहे.

डोंबिवली एमआयडीसीत अमुदान कंपनीत (Amudan Company Blast) झालेल्या स्फोटाच्या दुर्घटनेत अनेक कामगार मृत्युमुखी पडून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मृतदेहांची ओळख पटत नसल्याने बेपत्ता कामगारांचे नातेवाईक आपल्या माणसांचा शोध घेत आहेत. या दुर्घटनेत मनोज जोंधळे (वय 47) यांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यांच्या पत्नी मनीषा या त्यांच्या शोध घेण्यासाठी घटनास्थळी, रुग्णालयात, पालिका कार्यालय येथे खेटा मारत आहेत.

मनीषा यांचे पती या कंपनीत वॉचमन म्हणून काम करत होते. मात्र, स्फोटानंतर ते अद्याप सापडले नाहीत. याबाबत त्याच्या पत्नीना प्रशासन मदत करत नसल्याचे दिसून आले आहे. मनीषा यांनी सांगितले की, घटना घडली त्यावेळी त्या गावी होत्या. त्यांना घटनेची माहिती मिळताच त्या डोंबिवलीत आल्या. त्याआधी पासून त्यांचे नातेवाईक हे मनोज यांचा शोध घेत आहेत. मात्र, त्यांचा शोध लागत नाही आहे.

मला तीन मुली असून मला माझे पती हवे आहेत. त्यांना शोधण्याकरता आम्ही प्रयत्न केले. मात्र कोणीही इथे माहिती देत न्हवते. माझे पती मला हवे असल्याचे सांगत डीएनए टेस्ट ही रिपोर्ट (DNA Test Report) अद्यापही मिळाले नसल्याने कोणताही पुरावा हाती राहिला नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, मनीषा जोंधळे यांच्या मागणीनुसार आज पुन्हा महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून पुन्हा एकदा शोधकाम सुरू करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT